राज कुंद्राला यापूर्वी जुलै 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Raj Kundra शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राज कुंद्रा आणि त्याच्या इतर निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर अडल्टशी संबंधित प्रकरणात छापे टाकले आहेत.Raj Kundra
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता निवासी परिसर आणि कार्यालयांची झडती घेतली जात आहे. हा छापा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अश्लील साहित्य निर्मिती आणि वितरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज कुंद्राला यापूर्वी जुलै 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मड आयलंडमधील त्याच्या बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. या बंगल्यावर ॲडल्ट चित्रपटांचे शूटिंग होत होते आणि त्यांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्राचे नाव होते, असे बोलले जात होते. या प्रकरणात टीव्ही अभिनेत्री गेहाना वशिष्ठचे नाव पुढे आले होते. राज कुंद्राने हॉटशॉट ॲपद्वारे अडल्ट व्हिडिओ स्ट्रीम केले. मात्र, आता ॲपल आणि गुगलने आपापल्या प्ले स्टोअरवरून ते काढून टाकले आहे. राज या ॲपद्वारे ब्रिटीश कंपनीला ॲडल्ट कंटेंट विकायचा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App