वृत्तसंस्था
ढाका : शेख हसीना यांनी बांगलादेशातील लोकशाही दडपली असा आरोप करणाऱ्या जमाते इस्लामीच्या गुंडांनी बांगलादेशात 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले केले. त्यांची घरेदारी लुटली. मंदिरे जाळली. सर्वधर्मीयांसाठी अन्नदान शिबिर चालवणारे iskcon मंदिर देखील जमाती इस्लामीच्या गुंडांनी सोडले नाही. त्याला देखील त्यांनी आग लावून टाकली. Sheikh Hasina suppressed democracy in Bangladesh
शेख हसीना बांगलादेश सोडून निघून गेल्यानंतरही तिथला आरक्षण विरोधातला हिंसाचार थांबला नाही त्या हिंसाचारात आता जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे गुंड हिंदूंवर हल्ले करत आहेत. गुंडांच्या टोळ्या जमाव करून निवडून – निवडून हिंदुंना टार्गेट करत असून घरांना आगी लावत सुटला आहे. गुंडांनी दुकानांची लूटमार केली. बांग्लादेशातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची समाजकंटकांनी तोडफोड करून मंदिर पेटवून दिले.
बांग्लादेशी माीडिय द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 27 जिल्ह्यांमध्ये जमाते इस्लामीच्या गुंडांनी हिंदू समाजावर हल्ले केले. त्यांच्या घरांना आणि दुकानांना आगी लावल्या. लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यात धार्मिक हिंदू कार्याशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरी तोडफोड करुन लुटमार केली.
दंगेखोरांनी नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांच्या कॉम्प्युटर दुकानात तोडफोड करुन आग लावली. कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावात 4 हिंदू कुटुंबांच्या घरात तोडफोड आणि लुटमार केली. हातिबंधा उपजिल्हा पुरबो सरदुबी गांवात 12 हिंदुंची घर पेटवून दिली. पंचगढमध्ये अनेक हिंदु घरांमध्ये तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. ओइक्या परिषदेचे महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांच्यानुसार, असं कुठला जिल्हा नाहीय, की जिथे हिंदुंच्या घरांवर हल्ला झालेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.
हिंदू समाज चिंतेमध्ये
हिंदुंना घरातून बाहेर काढून मारहाण करण्याय येत आहे. दुकाने लुटण्यात येत आहेत. या हल्ल्यामुळे बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाज घाबरला असून चिंतेमध्ये आहे. दिनाजपूर आणि दूसऱ्या उपजिल्ह्यात 10 हिंदुंच्या घरांवर हल्ले झाले आहेत. गुंडांनी रेलबाजारहाट येथे एक मंदिरात तोडफोड केली.
200-300 च्या जमावाकडून हल्ला
बांग्लादेशातील हिंदू-बुद्ध ईसाई परिषदेचे सरचिटणीस उत्तम कुमार रॉय यांनी सांगितलं की, खानसामा उपजिल्ह्यात तीन हिंदुंच्या घरावर हल्ला करण्यात आला. लक्ष्मीपुर येथे गौतम मजूमदार यांनी सांगितलं की, संध्याकाळी 7.30 वाजता 200-300 पेक्षा जास्त हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मजली इमारतीला आग लावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more