पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास; कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!

Sharad pawar

नाशिक : पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास, कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांनीच आणली आहे. कारण त्यांनी स्वतःच राहुल गांधींच्या देशव्यापी नेतृत्वासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पण हे वक्तव्य करण्यामागचे मूळ रहस्य काय??, याचा थोडा आढावा घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणातले एक वेगळेच सत्य समोर येते. Sharad pawar now sees national leadership in rahul gandhi, because he sees maharashtra leadership in supriya sule!!

इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये काल सकाळी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाल्यानंतर सायंकाळी शरद पवारांची मुलाखत झाली. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींबद्दल काही दावे केलेच, पण त्या पलीकडे जाऊन देशाच्या नेतृत्वाविषयी देखील भाकीत वर्तविले. शरद पवार म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर देशाची जनता राहुल गांधींकडे गांभीर्याने पाहायला लागली आहे. एक दिवस असा येईल, की ते देशाचे नेतृत्व करतील. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्यांनी देशातल्या जनतेशी थेट संपर्क साधला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांची राजकीय प्रगल्भता देखील वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ते एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असा दावा शरद पवारांनी केला.



बाकी राष्ट्रवादी सोडून ज्यांनी भाजपशी मिळवणी केली, त्यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर “इंडिया” आघाडीत अधिक मजबूत होईल, असे पवार म्हणाले.

पण मूळात गेली कित्येक वर्षे राहुल गांधींकडे पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही म्हणून खिल्ली उडवणाऱ्या पवारांना अचानक राहुल गांधींमध्ये देशाचे नेतृत्व गुण कसे काय दिसायला लागले??, याचे राजकीय रहस्य मात्र उलगडले पाहिजे आणि ते रहस्य महाराष्ट्रात स्वतःच्या कन्येचे नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यातच दडले आहे.

एकदा का आपण राहुल गांधींकडे देशाचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत असे म्हटले की आपोआप महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे असे म्हणण्याची राजकीय शक्ती प्राप्त होते, असा पवारांचा होरा दिसतो. राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी आपण विश्वास व्यक्त केला, तर तो काँग्रेस नेतृत्वाला विशेषतः सोनिया गांधींना आवडू शकतो आणि त्या महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करण्यासाठी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना भाग पाडू शकतात, असाही पवारांचा होरा त्या वक्तव्यामागे दिसतो.

पण मूळात पवारांनी एखाद्या नेत्याची अशी प्रशंसा केल्यानंतर, तर तो नेता देशाच्या पंतप्रधानपदी बसल्याचे एकही उदाहरण नाही. इतकेच काय, पण पवारांचे जेवढे विरोधक होते, तेवढे राजकीय कर्तृत्वाने उंच आणि त्यामुळे ते पंतप्रधान पदावर बसल्याचे दिसून आले आहे.

त्याचबरोबर पवारांनी महाराष्ट्रात ज्या नेत्यांना प्रखर विरोध केला, ते नेते पुढे सरकल्याची ही उदाहरणे आहेत. पवारांनी विलासराव देशमुख यांना निवडणुकीत पाडले, पण काँग्रेसने त्यांना तब्बल 9 वर्षे मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस यांना पवार विरोध करतात, पण फडणवीसांकडे महाराष्ट्राचे 5 वर्षे नेतृत्व होते आणि आजही ते उपमुख्यमंत्री असले तरी शिंदे – फडणवीस आणि अजित पवार सरकारची सगळी सूत्रे फडणवीसच हलवतात ही राजकीय वस्तुस्थितीही महाराष्ट्रासमोर आहे.

त्यामुळे पवारांनी राहुल गांधी हे एक दिवस देशाचे नेतृत्व करतील असे म्हणणे आणि त्याचवेळी सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देता येईल, असा होरा बाळगणे या दोन्ही बाबी त्यांनी परवाच पाहिलेल्या संशयकल्लोळ अर्थात तसबीरीचा घोटाळा या नाटकासारख्याच आहेत!!

Sharad pawar now sees national leadership in rahul gandhi, because he sees maharashtra leadership in supriya sule!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात