एशियन पेंटसचे गैर कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती अश्विन दाणी यांचे निधन; वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वृत्तसंस्था

मुंबई : भारतातील सर्वात मोठी पेंट उत्पादक कंपनी एशियन पेंट्सचे गैर-कार्यकारी संचालक अश्विन दाणी यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. अश्विन यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला होता. एशियन पेंट्स ही कंपनी त्यांच्या वडिलांनी 1942 मध्ये सुरू केली होती.Senior industrialist Ashwin Dani, non-executive director of Asian Paints, passes away; He breathed his last at the age of 79

अश्विन हे 1968 मध्ये वडिलांच्या एशियन पेंट्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. ते 1997 मध्ये एशियन पेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.



एशियन पेंट्सची सुरुवात चार मित्रांनी मिळून 1942 मध्ये केली होती

1942 मध्ये चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या चार मित्रांनी मुंबईत एशियन पेंट्स आणि ऑइल प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. त्यावेळी कंपनीने पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा असे फक्त 5 रंग तयार केले होते.

एशियन पेंट्स ही देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी

एशियन पेंट्स ही बाजार भांडवलाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. एशियन पेंट्सचे मार्केट कॅप 3.03 लाख कोटी रुपये आहे. एशियन पेंट्स 15 देशांमध्ये कार्यरत आहेत आणि जगभरात 27 उत्पादन युनिट्स आहेत. कंपनीचा व्यवसाय 60 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.

Senior industrialist Ashwin Dani, non-executive director of Asian Paints, passes away; He breathed his last at the age of 79

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात