विमानतळ आणि औद्योगिक समूहांवर हल्ल्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा दल सतर्क

सर्वोच्च सायबर सुरक्षा आणि आयटी एजन्सी संशयास्पद ईमेलचा स्रोत शोधण्यात व्यस्त आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील विविध विमानतळ आणि टर्मिनल्सवर हल्ल्याच्या धमकीची प्रकरणे समोर आली आहेत. ‘टेरराइजर्स 111’ नावाच्या संघटनेने ही धमकी दिली आहे. ही धमकी संस्थेने अनेकांना ईमेलद्वारे दिली होती. त्यानंतर देशातील सर्व विमानतळ आणि टर्मिनल्सवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वोच्च सायबर सुरक्षा आणि आयटी एजन्सी संशयास्पद ईमेलचा स्रोत शोधण्यात व्यस्त आहेत.Security forces on high alert after threats of attacks on airports and industrial clusters



मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास एक संशयास्पद ईमेल पाठवण्यात आला. ज्यामध्ये नागपूर विमानतळावर हल्ल्याचाही दावाही करण्यात आला होता. त्यानंतर नागपूर शहर पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि त्यांचे पथक तातडीने विमानतळावर पोहोचले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अलर्ट केले. ब्लास्ट डिटेक्शन आणि एक्सप्लोझिव्ह डिस्पोजल टीम तैनात करण्यात आली होती.

नागपूरशिवाय जयपूर आणि गोवा विमानतळांवरही बॉम्बस्फोट घडवण्याची धकमी देण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ईमेलमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही हे सुनिश्चित करू की सर्वत्र रक्त पसरेल आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांना मारायचे आहे.’ यामागे टेरराइझर्स 111 नावाच्या संघटनेचा हात असल्याचे ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे. काही विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा दावाही करण्यात आला होता.

Security forces on high alert after threats of attacks on airports and industrial clusters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात