सत्यपाल मलिक यांचे पुन्हा खळबळजनक वक्तव्य, 2024 ला जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त बोलून पंतप्रधान नरेद्र मोदींवर निशाणा साधणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा एक नवा खळबळजनक दावा केला आहे. मलिक यांच्या दाव्यानुसार 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी राममंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. मलिक यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024हे काहीही करू शकतात

सत्यपाल मलिक म्हणाले की, 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही पर्वा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहेत, असा दावा मलिक यांनी केली.

सत्यपाल मलिक यांनी उलगडले पुलवामा हल्ल्यामागचे मोठे रहस्य

14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील सरकार जबाबदार असल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ती नाकारली.

Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात