विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : RSS भारताचा शेजारी बांगलादेशात हिंदूंवर हिंदूंच्या विरोधात सुरू असलेला हिंसाचार ताबडतोब थांबवा इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास यांची ताबडतोब सुटका करा, अशा आशयाची निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज काढले. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्रातल्या मोदी सरकारने योग्य तो हस्तक्षेप करावा, असा आग्रह सरकार्यवाहांनी केंद्र सरकारकडे धरला.RSS
होसबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की,
बांगलादेशात इस्लामी कट्टरपंथींयांचा हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. इस्लामिक कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले, हत्या आणि महिलांवरील अत्याचार अतिशय चिंताजनक आहेत. संघ त्याचा निषेध करतो. बांगलादेशचे सध्याचे सरकार मूकपणे हे अत्याचार पाहात आहे.
– बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवला. आता तेही दाबले जात आहे. या संदर्भात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारकडे आवाज उठविला पाहिजे.
– शांततापूर्ण निदर्शनांमध्ये हिंदूंचे नेतृत्व करणारे इस्कॉन साधू चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेश सरकारने तुरुंगात टाकले. हा अन्याय आहे. बांगलादेशी सरकारने चिन्मय कृष्णदास यांची ताबडतोब सुटका करावी.
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदनकुमार धर आहे. ते चितगाव इस्कॉनचे प्रमुख आहेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडला. यानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडल्या.
यानंतर बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली. चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ते झाले. सनातन जागरण मंचच्या माध्यमातून चिन्मय यांनी चितगाव आणि रंगपूरमध्ये अनेक सभांना संबोधित केले. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते.
25 ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचने 8 कलमी मागण्यांसह चितगाव येथील लालदिघी मैदानावर रॅली काढली. चिन्मय कृष्ण दास यांचे यावेळी भाषण झाले. यावेळी नवीन मार्केट चौकातील आझादी स्तंभावर काही लोकांनी भगवा ध्वज फडकावला. या ध्वजावर ‘आमी सनातनी’ असे लिहिले होते.
रॅलीनंतर 31 ऑक्टोबर रोजी बेगम खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाचे नेते फिरोज खान यांनी चितगावमध्ये चिन्मय कृष्ण दाससह 19 जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचा चितगावमध्ये जामीन फेटाळण्यात आला. यानंतर न्यायालयाच्या बाहेर हिंसाचार उसळला. यात वकील सैफुल इस्लाम यांना जीव गमवावा लागला.
चिन्मय प्रभूच्या अटकेवर भारताने नाराजी व्यक्त केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत हे दुर्दैवी आहे, परंतु शांततापूर्ण सभांद्वारे योग्य मागण्या मांडणाऱ्या धार्मिक नेत्यावर खटले सुरू आहेत.
27 नोव्हेंबर : इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी
इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका बांगलादेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने सैफुलच्या मृत्यूमागे इस्कॉनच्या लोकांचा हात असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. अशा स्थितीत या संघटनेवर बंदी घालायला हवी. या याचिकेत चितगावमध्ये आणीबाणी जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली होती.
28 नोव्हेंबर : इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी फेटाळली
28 सप्टेंबर रोजी ढाका उच्च न्यायालयाने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी फेटाळली होती. कोर्टात बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सांगितले की, आम्ही इस्कॉनच्या कारवायांविरुद्ध आवश्यक पावले उचलली आहेत. या प्रश्नाला सरकारचे प्राधान्य आहे.
शेख हसीनांची चिन्मयच्या सुटकेची मागणी
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही चिन्मय प्रभू यांच्या अटकेचा निषेध केला आणि अंतरिम सरकारला त्यांची तात्काळ सुटका करण्यास सांगितले. हसीना म्हणाल्या की, सनातन धर्माच्या एका प्रमुख नेत्याला अन्यायकारकपणे अटक करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) च्या भारतीय शाखेने म्हटले आहे की चिन्मय प्रभू हे संस्थेचे अधिकृत सदस्य नव्हते, परंतु ते त्यांच्या हक्क आणि भाषण स्वातंत्र्याचे समर्थन करतात. चिन्मय प्रभूपासून आम्ही दुरावलेले नाही आणि करणारही नाही, असे संघटनेने म्हटले आहे.
बांगलादेश सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी
इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास प्रभू यांची अटक आणि बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना होत असलेल्या वागणुकीबद्दल भारताने निषेध व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App