विशेष प्रतिनिधी
मुंबई :Chandrashekhar Bawankule महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख, वार आणि ठिकाण निश्चित झाले असून शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्सही लवकर संपण्याची चिन्हे आहेत.Chief Minister
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सायंकाळी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून महायुती सरकारच्या शपथविधीची घोषणा केली. त्यानुसार महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे आता सरकार स्थापना करण्याच्या निर्णयाला वेग आला असून मुख्यमंत्री पदावरचा सस्पेन्स देखील लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ दरे या गावी असले तरी ते तिथून लवकरच मुंबईत परतून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीवारी करून मंत्रिमंडळातली नावे निश्चित करणार आहेत.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री… — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, शिंदे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदावर आडून राहिले, भाजप त्यांना गृहमंत्री पद देणार नसेल, तर ते दुसऱ्या कुठल्या शिवसेना नेत्याला उपमुख्यमंत्री पद देतील वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी चालवून घेतल्या. परंतु, शिवसेनेच्या कुठल्याही सूत्रांनी त्या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App