Chaudhary Ajit Singh Death : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदल प्रमुख अजित सिंह यांचे आज (6 मे) निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे त्यांच्या फुप्फुसात संसर्ग वाढला होता, यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. RLD Chief Former Union Minister Chaudhary Ajit Singh Death Due To Covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदल प्रमुख अजित सिंह यांचे आज (6 मे) निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे त्यांच्या फुप्फुसात संसर्ग वाढला होता, यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
PM Modi condoles the passing away of Rashtriya Lok Dal President Chaudhary Ajit Singh "He was devoted to the interests of the farmers. He efficiently discharged the responsibilities of several departments at the Centre," says PM pic.twitter.com/fjQpijMKap — ANI (@ANI) May 6, 2021
PM Modi condoles the passing away of Rashtriya Lok Dal President Chaudhary Ajit Singh
"He was devoted to the interests of the farmers. He efficiently discharged the responsibilities of several departments at the Centre," says PM pic.twitter.com/fjQpijMKap
— ANI (@ANI) May 6, 2021
चौधरी अजित सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. चौधरी अजित सिंह यांनी शेतकरी हितासाठी स्वत:ला समर्पित केले होते, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे सुपुत्र चौधरी अजित सिंह उत्तर प्रदेशमधील बागपत येथून सात वेळा खासदार राहिले आहेत आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात शोककळा पसरली आहे. जाट समाजात अजित सिंह आणि त्यांच्या कुटुंबाची दबदबा आहे.
रालोदचे प्रमुख चौधरी अजित सिंह यांना 22 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या फुप्फुसातील संसर्ग हळूहळू वाढत गेला. मंगळवारी (4 मे) प्रकृती बिघडल्यावर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागच्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
RLD Chief Former Union Minister Chaudhary Ajit Singh Death Due To Covid 19
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App