कोरोनाशी लढायचंय.. मग आयुष मंत्रालयाने सुचविलेले हे बारा उपाय जरूर अंमलात आणा…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु आहे. दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविला आहे. आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असा इशारा तज्ज्ञानी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने कोरोनाला रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक सल्ले दिले आहेत. त्याचा वापर केल्यास तुम्ही कोरोनापासून स्वतःला वाचवू शकणार आहेत. त्याद्वारे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत होईल आणि कोरोनापासून तुम्ही वाचू शकणार आहात. To Boost immunity System Aayushya mantralaya given Advise To People To Take Ayurvedic ingredients.

आयुष मंत्रालयानं सांगितलेले उपाय पुढीलप्रमाणे

1. दिवसभरात गरम पाण्याचं सेवन करा. सकाळी, संध्याकाळी गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद टाका आणि या पाण्यानं गुळण्या करा.

2. घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं अन्नाचं सेवन करा. जेवणात जीरे, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर करा.

3. व्हिटॅमिन सीसाठी लिंबू आणि आवळ्याचं सेवन करा. आवळा आणि लिंबू यांचं समावेश असणाऱ्या पदार्थांचाही वापर करु शकता.



4. दररोज कमीत कमी 30 मिनिटांसाठी योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करा.

5. दिवसा झोप घेण्याऐवजी रात्री 7 ते 8 तासांसाठी झोप घ्या.

6. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा.

7. रात्री हळदीच्या दुधाचं सेवन करा. एक ग्लास दुधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा.

8. दररोज दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम घेऊ शकता.

9. तुळस, काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी यांपासून तयार केलेला हर्बल चहा किंवा काढ्याचं सेवन करा.

10. सकाळ-संध्याकाळी नाकात तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा गाईच तूप घाला.

11. कोरडा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात पुदिन्याची पानं, ओवा किंवा कापराचा वापर करु शकता.

12. दिवसातून दोन वेळा लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरेसोबत एकत्र करुन खा. यामुळे खोकला, घशातील खवखवीपासून आराम मिळेल.

To Boost immunity System Aayushya mantralaya given Advise To People To Take Ayurvedic ingredients.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात