वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मे अखेरीस ओसरेल, असे मत विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केले आहे. The Second Wave Of Coronavirus Will Vanished In May
कोरोनाची ही दुसरी लाट कदाचित मे महिन्याच्या मध्यापासून ते महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे, असे डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं.
काही मॉडेलच्या अभ्यासानुसार, जूनच्या सुरुवातीला ही लाट ओसरेल असंही समोर आलं आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करता मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल अशी शक्यता आहे असंही त्या म्हणाल्या.
लस घेण्याचे आवाहन
डॉ. गगनदीप कांग या ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीच्या फेलोपदी निवड झालेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. महिला पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींबद्दलच्या शंकांचेही निरसन केलं. लस घेतल्याने व्यक्तींना संरक्षण मिळते. त्यामुळे त्या घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
देशात लॉकडाऊन आवश्यक
भारतात लॉकडाऊन लावल्यास नक्कीच फायदा होणार आहे. येत्या दोन-तीन आठवड्यात जर रुग्णसंख्या कमी करायची असेल, तर लॉकडाऊन आवश्यक आहे. त्याचा परिणाम काहीच दिवसात नक्कीच दिसेल, असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App