वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिपोर्टवरून सरकार आणि सेबीवर हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi )यांनी शेअर बाजारातून जबरदस्त नफा कमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांत राहुल गांधींनी शेअर बाजारात गुंतवणूक करून 46.49 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. मार्चपर्यंत त्यांनी एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी 12 ऑगस्टपर्यंत वाढून 4.80 कोटी रुपये झाली आहे.
राहुल यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीच्या नामांकनात त्यांनी 15 मार्च 2024 रोजी त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4.33 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. त्याची किंमत आता 4.80 कोटी रुपये झाली आहे. त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅब्स, जीएमएम फोडलर, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस, टायटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स आणि एलटीआय माइंडट्री यांचा समावेश आहे.
मोठ्या कंपन्यांशिवाय राहुल गांधींनी छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. यामध्ये व्हर्टोस ॲडव्हर्टायझिंग आणि विनाइल केमिकलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 24 शेअर्स आहेत. यापैकी एलटीआय माइंडट्री, टायटन, टीसीएस आणि नेस्ले इंडिया या चार कंपन्यांमध्ये त्यांना तोटा झाला आहे. त्यांनी 5 महिन्यांत व्हर्टोसच्या शेअर्सची संख्या वाढवली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केवळ 260 शेअर्स होते, ते आता 5,200 पर्यंत वाढले आहेत.
या कंपन्यांमध्ये केली सर्वाधिक गुंतवणूक
कंपनी- गुंतवणूक -गुंतवणुकीचे मूल्य
एशियन पेंट्स- 35.25 – 37.52 बजाज फायनान्स – 35.89 – 36.47 एचयूएल – 27.02 – 31.97 आयसीआयसीआय बँक – 24.83 – 27.01 पिडिलाइट – 42.27 – 44.95 (आकडे लाख रुपयांमध्ये, 12 ऑगस्टपर्यंत)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more