Bangladeshi media : पवारांनी मोहम्मद युनूस यांना दिलेले “सेक्युलर सर्टिफिकेट” बांगलादेशी माध्यमांनी झळकवले!!

Bangladeshi media

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशात प्रचंड धुडगूस घालून, हिंदू विरोधात हिंसाचार करून जमाते इस्लामी आणि कट्टर जिहादी संघटनांनी शेख हसीना सरकारला घालविले. त्यांच्या जागेवर मोहम्मद युनूस यांच्या रूपाने नोबेल पुरस्कार विजेता चेहरा सत्तेवर बसविला, पण प्रत्यक्षात बांगलादेशात जिहादी इस्लामिस्टांचीच सत्ता स्थापन झाली. Bangladeshi media praise pawar’s secular certification of Mohammed yunus

मात्र मोहम्मद युनूस यांच्याबरोबरच्या जुन्या मैत्रीला जागून शरद पवारांनी त्यांना ते “सेक्युलर” असल्याचे “सर्टिफिकेट” देऊन टाकले. मोहम्मद युनूस सेक्युलर असल्याने ते बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था ठीक करतील. ते हिंदू – मुसलमान असा भेद करणार नाहीत, असा दावा पवारांनी केला. पवारांच्या या दाव्याच्या बातम्या भारतातल्या काही माध्यमांनी दिल्या, पण त्यापलीकडे जाऊन मोहम्मद युनूस आणि बांगलादेशाची प्रतिमा सुधारण्यासाठी बांगलादेशी माध्यमांनी पवारांच्या त्या वक्तव्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर झळकवल्या. भारतातल्या मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याने मोहम्मद युनूस यांना ते सेक्युलर असल्याचे सर्टिफिकेट कसे दिले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणि दोन्ही नेत्यांमधले संबंध कसे सौहार्दपूर्ण आहेत, याचे वर्णन बांगलादेशी माध्यमांनी केले.

https://www.daily-sun.com/post/761760

मोहम्मद युनूस यांना त्यांच्या ग्रामीण बँकिंग सिस्टीम साठी जरी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले असले, तरी बांगलादेशातला हिंदू विरोधी हिंसाचार आणि तिथल्या जिहादी संघटनांनी घातलेला हैदोस यावर सुरुवातीला ते मूग गिळूनच गप्प बसले होते. बांगलादेशातला हिंसाचार शिगेला पोहोचला होता, तेव्हा मोहम्मद न्यूज बांगलादेशात नव्हतेच. ते पॅरिस मध्ये होते. तिथून त्यांनी बांगलादेशातल्या हिंसाचाराचा निषेध केला नाहीच, तर उलट तो विद्यार्थ्यांचा उठाव होता, विद्यार्थ्यांची क्रांती होती, अशी मखलाशी ते करत राहिले होते.

https://www.thedailystar.net/news/asia/india/news/yunuss-secular-image-bring-normalcy-bangladesh-sharad-pawar-3675996

बांगलादेशातली सत्ता हस्तगत करून मोहम्मद युनूस यांना सरकारचे मुख्य सल्लागार नेमल्यानंतर त्यांनी नेमलेल्या गृहमंत्र्यांनी हिंदूंची हात जोडून माफी मागितली, पण ती माफी लाखो हिंदूंनी ढाक्यात मोर्चा काढल्यानंतर मागितली गेली. जगभर हिंदूंचा संताप झाला. बांगलादेशात हिंदूंचा उद्रेक झाला, तर तो आपल्याला सावरता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंतरच माफी मागण्याचे नाटक रंगवण्यात आले.

प्रत्यक्षात मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातल्या जमाती इस्लामी आणि हिफाजत ते इस्लाम या संघटनांच्या प्रतिनिधींना सरकारमध्ये स्थान दिले. विद्यार्थी आंदोलनाच्या खाली नावाखाली हिंसाचारालाची धावणे देणाऱ्यांना सल्लागार नेमले इतकेच काय पण वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांसाठी शेख हसीना सरकारने तुरुंगात घातलेल्यांना म्होरक्यांना सोडून देण्याचाही घाट मोहम्मद युनूस यांनी घातला आहे.

एकीकडे हिंदूंची हात जोडून माफी मागायची आणि दुसरीकडे जिहादी संघटनांच्या म्होरक्यांना तुरुंगातून सोडून द्यायचे, असली डबल गेम मोहम्मद युनूस यांचे सरकार खेळले आहे, पण त्याच मोहम्मद युनूस यांना पवारांनी भारतात बसून ते “सेक्युलर” असल्याचे “सर्टिफिकेट” दिले आणि त्याच सर्टिफिकेटचा बांगलादेशी माध्यमांनी वापर करून मोहम्मद युनूस आणि बांगलादेशी सरकारचे प्रतिमा वर्धन केले.

Bangladeshi media praise pawar’s secular certification of Mohammed yunus

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात