Kolkata doctor rape : कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण आता ‘सीबीआय’कडे!

Kolkata doctor rape

उच्च न्यायालयाचे सीबीआय तपासाचे आदेश देत कागदपत्रे तत्काळ सोपवण्याचे आदेश दिले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोलकाता ( Kolkata ) उच्च न्यायालयाने आरजी मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने तातडीने सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. यावेळी उच्च न्यायालयाने एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याला दुसऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य बनवल्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारला गोत्यात आणले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी (१४ ऑगस्ट) सकाळी १० वाजेपर्यंत महिला डॉक्टर हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच संपावर बसलेल्या डॉक्टरांना संप मिटवण्याचे आवाहन उच्च न्यायालयाने केले आहे. ही त्यांची ‘पवित्र जबाबदारी’ असल्याचे त्यांनी सांगितले.



काल पीडित डॉक्टरच्या घरी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, रविवारपर्यंत कोलकाता पोलिस हे प्रकरण सोडवण्यात अपयशी ठरले तर ते सीबीआयकडे सोपवण्यात येईल.

कोलकाता बलात्कार प्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टाने मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना स्वतःहून रजेवर जाण्यास सांगितले, अन्यथा न्यायालय आदेश देईल. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, मग त्या प्रकरणी मुख्याध्यापकांनी तक्रार का दिली नाही, असा सवाल हायकोर्टाने सुनावणीदरम्यान विचारला आहे.

Kolkata doctor rape murder case now to CBI

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात