कोलकातामधून दोन दहशतवाद्यांना अटक Rameshwaram Cafe Blast Case Big success for NIA in Rameshwaram Cafe blast case The main mastermind was also caught
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAला मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणी NIAने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी या दोघांची नावे आहेत.
या दोघांना एनआयएच्या पथकाने कोलकाता येथून अटक केली आहे. 1 मार्च रोजी बंगळुरूमधील एका कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात 9 जण जखमी झाले होते. या घटनेच्या सुमारे दीड महिन्यानंतर NIAने या दोन्ही दहशतवाद्यांना 12 एप्रिल रोजी सकाळी अटक केली. हे दोघेही खोट्या ओळखीने तिथे लपून बसले होते.
कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये या स्फोटाचा मुख्य सूत्रधारही पकडला गेला आहे. वास्तविक मुसावीर हुसेन शाजिबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता, परंतु अब्दुल मतीन ताहा हा या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड होता. अब्दुलने बंगळुरूमध्ये या स्फोटाचा कट रचला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App