मानवेंद्र सिंह भाजपमध्ये परतले, मोदींच्या रॅलीपूर्वी केला पक्षात प्रवेश

भाजपच्या या निर्णयामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे


विशेष प्रतिनिधी

माजी खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र कर्नल (निवृत्त) मानवेंद्र सिंह यांनी 6 वर्षानंतर आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. आज बाडमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली असून त्यांच्या रॅलीपूर्वीच मानवेंद्र सिंह यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.Manvendra Singh returns to BJP joins party before Modis rally



भाजपच्या या निर्णयामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. यासोबतच बाडमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे रवींद्र सिंह भाटी यांचाही तणाव वाढणार आहे. कारण मानवेंद्र सिंह यांच्या पुनरागमनामुळे भाजपला राजपूत समाजाचा पाठिंबा मिळणार आहे, त्या आधारावर भाटी आपला विजय निश्चित मानत होते

यावेळी बाडमेर लोकसभा जागेवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या जागेवरून शिव आमदार आणि भाजपचे माजी नेते रवींद्र सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. अशा परिस्थितीत बाडमेरचे राजकीय समीकरण बदलण्यासाठी आणि या लोकसभा जागेवर भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज बाडमेरमध्ये एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत..

Manvendra Singh returns to BJP joins party before Modis rally

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात