World Cup 2023 : धरमशालामध्ये पावसाची शक्यता, आज भारत आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यास काय होईल?


धरमशाला दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आहे.

विशेष प्रतिनिधी

हिमाचल :  एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज (२२ ऑक्टोबर) धर्मशाला येथे एक महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणारा भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा पाचवा सामना असेल. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पण क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही  समोर येत आहे. वास्तविक, धरमशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पूर्ण होण्याची फारच कमी आशा आहे किंवा हा सामना कमी षटकांचा असू शकतो. याला कारण म्हणजे पाऊस. Rain likely in Dharamshala what will happen if India vs New Zealand match is called off today

Accuweather नुसार, रविवारी धरमशालामध्ये कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. आज  पावसाची शक्यता ४२ टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग २६ किमी/ताशी असणार आहे.

चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे हा सामना दुपारी २ वाजता सुरू होणार असून यादरम्यान पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. धरमशालामध्ये दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आणि दुपारी ३  वाजता ४७ टक्के आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ३ वाजल्यानंतर पावसाची शक्यता खूपच कमी होईल. ४ ते ६ या वेळेत पावसाची शक्यता १४ टक्के असेल. यानंतर ते २ टक्क्यांपर्यंत राहील. या संदर्भात, सामना उशीरा सुरू होऊ शकतो.

विश्वचषक २०२३ साठी आयसीसीच्या नियमांनुसार, लीग सामन्यांसाठी ‘राखीव दिवस’ ची तरतूद नाही. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाल तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. आतापर्यंतच्या विश्वचषकातील एकाही सामन्यात पावसाने व्यत्यय आणलेला नाही ही चांगली गोष्ट आहे.

Rain likely in Dharamshala what will happen if India vs New Zealand match is called off today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात