रेल्वे बोर्डाची मोठी घोषणा; अपघातग्रस्तांच्या नुकसानभरपाईत थेट 10 पट वाढ, आता मृतांच्या वारसांना मिळतील 5 लाख


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे अपघाताशी संबंधित भरपाईच्या रकमेत 10 पट वाढ केली आहे. याअंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मदतीची रक्कम 50 हजार रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. गंभीर दुखापतीसाठी मदतीची रक्कम 25 हजारांवरून अडीच लाख रुपये करण्यात आली आहे.Railway Board’s Big Announcement; Direct 10 times increase in compensation to accident victims, now heirs of deceased will get 5 lakhs

तसेच किरकोळ दुखापत झाल्यास मदतीची रक्कम 5 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. मदतीच्या रकमेशिवाय अपघातानंतर प्रवाशांचा रुग्णालयाचा खर्चही बोर्ड उचलणार आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला दुखापत किती गंभीर आहे यावर अवलंबून 3,000 रुपये, 1,500 रुपये आणि 750 रुपये प्रतिदिन खर्च होतील.रेल्वे बोर्डाने 18 सप्टेंबर 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून मदत रकमेत वाढ करण्यात आली आहे. या तारखेपासून नवीन मदत रक्कम लागू होईल. यापूर्वी ही रक्कम 2012-2013 मध्ये सुधारित करण्यात आली होती.

रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांसाठीही मदत रक्कम दिली जाईल

परिपत्रकानुसार, जे रस्ते वापरकर्ते रेल्वेच्या चुकीमुळे मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंग फाटक अपघातांचे बळी ठरले आहेत ते देखील मदत रक्कम मिळण्यास पात्र असतील. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवर जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना आता 5 लाख रुपये, तर गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. किरकोळ दुखापत झाल्यास लोकांना 50 हजार रुपये मिळतील. यापूर्वी ही रक्कम 50 हजार, 25 हजार आणि 5 हजार इतकी होती.

याशिवाय अतिरेकी हल्ला, हिंसक हल्ला किंवा चोरी यांसारखी कोणतीही अनुचित घटना घडल्यास मृतांच्या आश्रित, गंभीर जखमी आणि मध्यम जखमींना अनुक्रमे दीड लाख, 50 हजार आणि 5 हजार रुपये देण्यात येतील, असेही या परिपत्रकात लिहिले आहे. पूर्वी ही रक्कम 50 हजार, 25 हजार आणि 5 हजार रुपये होती.

या घटनांत मिळणार नाही भरपाई

मानवरहित लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांना, विनापरवानगी आत घुसलेल्यांना आणि रेल्वेच्या वरच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांना कोणतीही अनुग्रह रक्कम दिली जाणार नाही, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Railway Board’s Big Announcement; Direct 10 times increase in compensation to accident victims, now heirs of deceased will get 5 lakhs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात