33 % महिला आरक्षण : परिवारवादी जातीनिष्ठ राजकारण संपण्याची भीती, लालू पुत्राची भाषा धमकी भरली!!; म्हणे, ईंट से ईंट बजा देंगे!!


वृत्तसंस्था

पाटणा : महिलांना 33% आरक्षण देणारे नारीशक्ती सन्मान विधेयक संसदेत मंजूर होताच संतप्त झालेल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी आता देशभर दंगली घडवण्याची मनसुबे आखले आहेत. ते त्यांच्याच तोंडून बाहेर आले आहेत. महिला आरक्षणात OBC आरक्षणाचाच्या निमित्ताने खोडा घालणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी आता हिंसाचार घडविण्याची खुली धमकी दिली आहे. Fear of end of family based caste politics

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या तोंडी ही भाषा आली आहे. महिला आरक्षण विधेयक संमत झाले असले तरी ते नेमके कधी लागू होणार??, कुठे लागू होणार??, याविषयी सरकार काही बोलत नाही. त्यामध्ये ओबीसी, दलित, मुस्लिम महिलांना आरक्षण दिलेले नाही. OBC हा लढवय्या समाज आहे. त्यामुळे ईंट से ईंट बजा देंगे लेकिन OBC आरक्षण ले कर रहेंगे, अशी धमकी भरली भाषा तेजस्वी यादवांनी वापरली आहे.

तेजस्वी यादवांच्या तोंडी आलेली धमकी भरली भाषा नवीन नाही. त्यांचे पिता लालूप्रसाद यादव जुनीच ही भाषा आहे. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार अस्तित्वात असताना हेच महिला आरक्षण विधेयक मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीने आणि लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाने अशीच धमकी भरली भाषा वापरून रोखून धरले होते आणि नंतर ते विधेयक डस्टबिन मध्ये गेले होते. पण आता केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे मोदी सरकार अस्तित्वात आहे. काँग्रेसची ही या विधेयकाला संमत करताना सरकारला साथ मिळाली. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे काहीही चालले नाही. त्यांचे वर्चस्व मोडीत निघाले. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांची भाषाही त्यापेक्षा जास्त घसरली.

इतकेच नाही तर आपले परिवारवादी आणि जातीनिष्ठ राजकारण 33% महिला आरक्षणातून उद्ध्वस्त होण्याची भीती मुलायम सिंग आणि लालू प्रसाद यादवांच्या परिवारातल्या नेत्यांना वाटते. त्यातूनच त्यांच्या तोंडी ही धमकी भरली भाषा आली आहे.

 

Fear of end of family based caste politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात