स्टॅलिनपुत्राने पुन्हा ओकली गरळ, उदयनिधींनी म्हणाले- सनातनला नष्ट करण्यासाठीच द्रमुकची झाली स्थापना

वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूचे मंत्री आणि DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रित न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले-राष्ट्रपती मुर्मू विधवा आहेत आणि आदिवासी समाजातून आल्या आहेत त्यामुळेच त्यांना बोलावले नाही.Stalin’s son accused again, Udayanidhi said- DMK was formed to destroy Sanatan

त्यांनी उपहासाने विचारले, यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का? सनातनबद्दलच्या त्यांच्या याआधीच्या टिप्पण्यांवर ते म्हणाले- लोकांनी माझ्या डोक्यावर बक्षीस ठेवले आहे, परंतु मी या सर्व गोष्टींना घाबरत नाही.



सनातनला संपवण्यासाठी द्रमुक पक्षाची स्थापना करण्यात आली आणि जोपर्यंत आम्ही आमचे ध्येय साध्य करत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. मदुराईमध्ये पक्षाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

हिंदी अभिनेत्रीला बोलावले, राष्ट्रपतींना नाही

उदयनिधी म्हणाले- संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले. भाजपने तामिळनाडूतून अधीनम (संत) बोलावले. मात्र भारताचे प्रथम नागरिक असूनही राष्ट्रपतींना त्याच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.

इतकंच नाही तर महिला आरक्षण विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काही हिंदी अभिनेत्रींना बोलवण्यात आले, पण राष्ट्रपतींना विचारलेही नव्हते. सनातन धर्माच्या प्रभावामुळे या सर्व गोष्टी घडत असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपची तुलना विषारी सापाशी

उदयनिधी यांनी 10 सप्टेंबर रोजी भाजपची तुलना विषारी सापाशी केली होती. त्यांनी AIADMK लाही कचऱ्याचा ढीग म्हटले होते. ते म्हणाले होते- कचऱ्यातून साप आमच्या घरात शिरतो. सापांचा नायनाट करायचा असेल तर कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि AIADMK यांना तामिळनाडूतून हद्दपार केले पाहिजे.

सनातनची तुलना डेंग्यू-मलेरियाशी ​​​​​​​

सनातन धर्म वादावर उदयनिधी म्हणाले होते की, भविष्यातही या विरोधात बोलत राहणार. ते म्हणाले, “तामिळनाडूमध्ये गेल्या 100 वर्षांपासून सनातन धर्माविरोधात आवाज उठवला जात आहे, आम्ही पुढील 200 वर्षेही त्याविरोधात बोलत राहू.

सनातनवर केलेली टिप्पणी नवीन नाही, असे ते म्हणाले. उदयनिधी म्हणाले, यापूर्वी अनेक प्रसंगी बीआर आंबेडकर, पेरियार (डीके संस्थापक ईव्ही रामासामी) आणि एम करुणानिधी (माजी द्रमुक संरक्षक) यांनी याबद्दल बोलले होते.

Stalin’s son accused again, Udayanidhi said- DMK was formed to destroy Sanatan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात