अमेरिका + चीन यांचा “हात” दिसत असताना राहुल गांधींनी प्रश्न विचारला, बांगलादेशातील घटनांमध्ये “परकीय हात” होता का??

rahul gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंसाचारामागे अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए आणि चीन यांचा “हात” असल्याचे उघड दिसत असताना भारताच्या लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत प्रश्न विचारला, “बांगलादेशातील घटनांमागे परकीय हात होता का??” Rahul Gandhi raises question on possible involvement of foreign hand

2023 मध्ये वकार उज जमान यांना शेख हसीना यांनी लष्कर प्रमुखपदी नेमले, त्याच वेळी भारतातल्या राजनैतिक वर्तुळाने शेख हसीना यांना वकार उज जमान यांच्या चीन धार्जिण्या धोरणाविषयी इशारा दिला होता. पण आपल्याला 2024 ची निवडणूक लढवण्यात मूळातच रस नाही. त्यामुळे आपण उपलब्ध पर्यायानुसार वकार उज जमान यांना लष्कर प्रमुखपदी नेमल्याचा खुलासा शेख हसीना यांनी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी बोलताना केला होता. परंतु याच वकार उज जमान यांनी शेख हसीनांना तोंडावर 45 मिनिटांत बांगलादेश सोडून जायला सांगितले.

शेख हसीना चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तिस्ता पाणी वाटप करार तसेच बांगलादेशातील प्रकल्पांना आर्थिक मदत हा विषय त्यांच्या चर्चेचा होता. परंतु चीनने त्यांच्या विस्तारवादी धोरणानुसार शेख हसीना यांच्यावर जाचक अटी आदल्याने त्या चीन दौरा अर्धवट सोडून परत आल्या. भारताबरोबर त्यांनी तिस्ता पाणी वाटप करार केला. याचा चीनला राग आलाच होता. त्यानंतरच बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आणि त्यात शेख हसीना यांचा राजकीय बळी गेला.

दरम्यानच्या काळात अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी डोनाल्ड लू यांचा बांगलादेश दौरा झाला होता. जिथे विक्टोरिया न्यूलँड आणि डोनाल्ड लू जातात तिथे अरब स्प्रिंग सारखी “क्रांती” होते. याचा प्रत्यय बांगलादेशात देखील आला. लोकशाहीवादी नेत्या शेख हसीना देशातून निघून गेल्या. बांगलादेशात आता जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी यांच्या प्रभावाखालचे सरकार काम करणार आहे, मग भले त्या सरकारला सल्ला देण्याचे काम मोहम्मद युनूस यांच्यासारखे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ करणार असतील, तरी सत्तेची सूत्रे इस्लामी कट्टरवाद्यांच्याच हाती राहणार आहेत.

या सगळ्या धोकादायक बाबी उघडपणे आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून बाहेर आल्या असताना राहुल गांधींनी मात्र केंद्र सरकारला सर्वपक्षीय बैठकीत प्रश्न विचारला, “बांगलादेशातल्या घटनांमध्ये परकीय हात होता का??” त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर सीएए आणि एनआरसी विरोधातले फसलेले आंदोलन होते का??

Rahul Gandhi raises question on possible involvement of foreign hand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात