विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबतचा पहिला पॉडकास्टचा व्हिडिओ शुक्रवारी लाँच झाला. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य आणि राजकारणाशी संबंधित पैलूंवर मोकळेपणाने भाष्य केले. बालपणीच्या मित्रांना आठवताना ते म्हणाले की, मला खेद वाटतो की आता कुणीही ‘तू’ म्हणणारा नाही. मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी मित्रांसाठी पार्टी दिली. मात्र, मी त्यांच्यात ‘मित्र’ शोधत होतो, पण ते माझ्यात ‘सीएम’ पाहत होते. ही दरी आजतागायत भरून काढता आलेली नाही याचा खेद वाटतो. गोध्रात रेल्वे पेटवल्यानंतर सुरक्षा कारणाने जाणे कठीण होते, पण मी म्हणालो, काही झाल्यास माझी जबाबदारी. विद्यार्थी जीवन, सोशल मीडिया, चिंता, अपयश या विषयांवर त्यांनी भाष्य केले.Narendra Modi
पॉडकास्टमधील पीएम मोदींचे ठळक मुद्दे…
माझा एकच विचार – ‘नेशन फर्स्ट’
राजकारणातील विचारधारेच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, माझी एकच विचारधारा आहे आणि ती म्हणजे नेशन फर्स्ट. कोणतीही कल्पना नेशन फर्स्ट या श्रेणीत बसल्यास ती स्वीकारण्यास मी सदैव तयार आहे.
राजकारणात यशस्वी होण्याचा मंत्र
राजकारणात प्रवेश आणि त्यात यशस्वी होणे या भिन्न गोष्टी आहेत. यशस्वी होण्यासाठी समर्पण, बांधिलकी, लोकांच्या सुख-दु:खात सोबती असणे आणि संघाचे खेळाडू असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःला तिस्मार खान समजून राजकारणात उतरलात तर यशाची शाश्वती नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा नसून ध्येय घेऊन येण्याची गरज आहे.
राजकारण हे उद्योजकतेपेक्षा वेगळे
मोदी म्हणाले, उद्योजकता राजकारणापेक्षा वेगळी आहे. उद्योजकाचे पहिले प्रशिक्षण म्हणजे स्वत:ची वृद्धी. राजकारणातील पहिले प्रशिक्षण म्हणजे झोकून देणे. उद्योजकतेमध्ये प्रथम क्रमांकाची स्पर्धा..
कम्फर्ट झोनचे व्यसन असणे चुकीचे
कम्फर्ट झोनबद्दल बोलताना ते म्हणाले की, यातून बाहेर पडण्याची गरज आहे. बहुतेक लोक अयशस्वी होतात कारण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकत नाहीत. प्रगतीसाठी जोखीम घेणे महत्त्वाचे आहे.
संकटातून प्रेम करायला शिकलो
पंतप्रधान म्हणाले, माझे जीवन मी नाही, तर परिस्थितीने निर्माण केले. समस्या विद्यापीठ आहे. ते मला खूप काही शिकवते. मी संकटावर प्रेम करायला शिकलो आहे.
चिंता आणि अपयश या विषयावर
पंतप्रधान म्हणाले की मीही माणूस आहे. मलाही चिंता आहे, पण फारसा विचार करत नाही. कदाचित मी धारण केलेले पदही हे करू देत नाही. मी अपयशावर रडणारा माणूस नाही.
मी स्वतःला भेटणे चुकवतो
लोक आम्हाला भेटतात, परंतु स्वतःला भेटायला विसरतात. पूर्वी दरवर्षी कुठेतरी ३-४ दिवस एकांतात जायचो. सध्या मी हे करू शकत नाही, याची सल आहे.
गोध्रात रेल्वेला आग लागली तेव्हा तत्काळ पोहोचलो
पंतप्रधान म्हणाले, २००२ मध्ये मुख्यमंत्री होतो. आमदार होऊन ३ दिवसही झाले नव्हते. गोध्रा रेल्वेला आग लागली. तेव्हा सिंगल इंजिन हेलिकॉप्टर होते. पण सुरक्षा यंत्रणेने व्हीआयपी हवाला देत त्यास मनाई केली. तेव्हा मी म्हणालो, मी सामान्य माणूस आहे. जबाबदारी माझी राहील. नंतर आम्ही गोध्राला गेलो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App