विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. सत्तेसाठी ते सतत उलट उड्या मारतात. त्यामुळे एकत्र येण्यासाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. ही पक्ष एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेते परस्परांवर टीका करत नाहीत. येत्या महिनाभरात अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणार आहेत, असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत केला.Sanjay Shirsat
शिरसाट म्हणाले की, काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडला. त्यानंतर पुन्हा काँग्रेससोबत आला. त्यानंतर पहाटे स्वतंत्र शपथदेखील घेतली आणि पुन्हा उद्धवसेनेसोबत गेले. त्यामुळे त्यांना पक्ष बदलायची सवय आहे. जयंत पाटील नाराज आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांना काम करून दिले जात नाही. त्यामुळे जास्त काळ ते या पक्षात राहणार नाहीत.
ठाकरे फडणवीसांच्या प्रेमात
आदित्य ठाकरे यांनी तीन वेळा फडणवीस यांची भेट घेतली आहे. ते फडणवीसांच्या प्रेमात पडले आहेत. सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलणाऱ्या भूमिका आम्ही बघत आहोत. टोमणे मारणाऱ्यांना आता कळाले आहे की पाच वर्षे काही होणार नाही. पाण्याशिवाय मासा तडफडतो त्याप्रमाणे ते तडफडत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App