विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुण्यातल्या BPO महिला कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेतली असून या अत्यंत गंभीर प्रकरणाची आणि पुण्यातल्या तसेच देशातल्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षा वातावरणाची पूर्ण तपासणी करण्यासाठी फॅक्ट फाईंडिंग कमिटी ताबडतोब नेमली.
पुण्यात अनेक लोकांसमोर शुभदा कोदरे या महिला कर्मचाऱ्याची तिचाच सहकारी कृष्णा कनोजा याने हत्या केली. त्यामुळे कामाच्या ठिकाणच्या हिंसक वातावरणाच्या विषयी गंभीर चर्चा सुरू झाली. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी घेऊन त्यांनी ताबडतोब फाईंडिंग कमिटी नेमली.
या कमिटीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या मीनाक्षी नेगी, हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक डॉ. बी. के. सिन्हा, केरळच्या माजी पोलीस महासंचालक श्रीमती आर श्रीलेखा या अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाचे कायदे सल्लागार अधिकारी मनमोहन वर्मा सहाय्य करणार आहेत.
राष्ट्रीय महिला हक्क कायद्याच्या परिप्रेक्षात संबंधित कमिटी विविध आयटी, बीपीओ कंपन्यांमधली तसेच कॉल सेंटर मधील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षेसंबधी वस्तुस्थिती, त्याचबरोबर प्रत्यक्ष कामाची स्थिती, महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा कंपन्यांनी नेमलेल्या सुरक्षा व्यवस्था, याचा कसून तपास करणार असून त्यातील उणिवा दूर करण्यासाठी काही गंभीर आणि महत्त्वाच्या शिफारशी करणार आहे.
Narayan Rane मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवेल इतकी भाजपची ताकद, नारायण राणे यांचा विश्वास
कुठलीही गंभीर घटना घडत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकांविषयी एकूणच जनतेत जागृती व्हावी त्याचबरोबर संबंधित घटना अथवा घडामोड रोखण्यासाठी तत्काळ कोणते प्रयत्न करता येतील, त्यासाठी कोणती कार्यवाही करावी लागेल या संदर्भात देखील कमिटी विचार करून शिफारस करणे अपेक्षित आहे.
संबंधित कंपन्या आणि विविध कायदेशीर संस्था संघटना यांच्यातल्या नियमित समन्वय याविषयी देखील संबंधित कमिटी वस्तुस्थिती जाणून घेणार असून या समन्वयातल्या विशिष्ट उणिवा दूर करण्यासाठी काही शिफारशी करणार आहे.
संबंधित कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेविषयी करण्यात करणे अपेक्षित असलेल्या उपाययोजनांविषयी आणि अंमलबजावणी विषयी कठोर शिफारशी देखील कमिटी करणे अपेक्षित आहे.
संबंधित कमिटीला 10 दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल देण्याचे सूचना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली आहे.
या सर्व संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे मीडिया अडवायजर श्री. शिवम गर्ग यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल. +91-8130375035
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App