Sharad Pawar : पवारांना उपरती, बदलली घराणेशाही रणनीती; महापालिका + झेडपी निवडणुकीत देणार 70 % नव्या युवकांना संधी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पवारांच्याच घरातले 3 खासदार आणि 2 आमदार केल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित घराणेशाहीतल्या युवकांना तिकिटे नाकारून 70 % तिकीटे नव्या चेहऱ्यांना देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतः यासंदर्भात सूतोवाच केले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दोन दिवस बैठक झाली. त्या बैठकीत पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतली राष्ट्रवादीची रणनीती उलगडली. यामध्ये सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच प्रस्थापित घराणेशाहीचा वस्तुस्थितीदर्शक आरोप होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी फूट पडली असली, तरी प्रत्यक्षात आज पवारांच्या घरातलेच 3 खासदार आणि 2 आमदार विद्यमान आहेत. स्वतः पवार आणि सुनेत्रा पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. सुप्रिया सुळे लोकसभेत आहेत. अजित पवार आणि रोहित पवार आमदार आहेत. हे सगळे नेते पवारांच्याच घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आणि 10 आमदार यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधी कुठल्या ना कुठल्यातरी घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

पण पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर मात्र पवारांनी रणनीती बदलत महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 % तिकिटे, तर घराणेशाही नसलेल्या युवकांना 70 % तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे.

का देणार नवे चेहरे??

अर्थात या निर्णयामागे पवारांची एक विशिष्ट राजकीय मजबुरी देखील आहे. ती म्हणजे, पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस मधले हार्डकोअर नेते किंवा कार्यकर्तेच उरलेले नाहीत. ते सगळे नेते आणि कार्यकर्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत निघून गेले आहेत. अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतच पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या संस्कृतीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय भवितव्य दिसत आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीतल्या प्रस्थापित घराणेशाही मधले युवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी चिन्हावरची तिकिटे मागण्यापेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीत घड्याळ चिन्हाचीच तिकिटे मागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित राजकीय मजबुरीतून पवारांनी प्रस्थापित घराणेशाहीतल्या युवकांपेक्षा घराणेशाही पार्श्वभूमी नसलेल्या युवकांना 70 % तिकीट देण्याची घोषणा केलेली दिसत आहे.

NCP new youth opportunity Sharad Pawar says

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात