विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे सेनेत इनकमिंग, तर भाजपची सदस्य नोंदणी राष्ट्रवादी (शप)मध्ये मात्र जयंत पाटलांविरुद्ध मोर्चे बांधणी, अशा घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राला महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून इन्कमिंग वाढले आहे, तर भाजपने सगळ्या महाराष्ट्रभर सदस्यता नोंदणी जोरात सुरू केली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात भाजपने 1 कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट ठेवले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई सह विविध महापालिका क्षेत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून इनकमिंग वाढले आहे.
पण या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात तरुण नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व फटका बसला. पवारांच्या 60 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना “लोवेस्ट परफॉर्मन्स” पहावा लागला. त्यांना फक्त 10 आमदार निवडून आणता आले. काही झाले तरी आपण 50 60 आमदार निवडून आणू शकतो, या पवारांच्या पवारांच्या दर्पाला महाराष्ट्रातल्या मतदारांनी धक्का दिला.
पण एवढे होऊन देखील पवारांच्या राष्ट्रवादीतली गटबाजी थांबली नाही. राष्ट्रवादीत तरुण नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीत आवाज उठवला. जयंत पाटलांना आता बदला. त्यांच्या ऐवजी तरुण नेते आमदार रोहित पवार किंवा रोहित पाटलांना जबाबदारी द्या, अशा मागण्यांचा “एको” यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गुंजला.
त्यावर जयंत पाटील यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या वॉर्डांमध्ये किंवा प्रभागांमध्ये तुतारी चिन्हावर किती मते आणली, याचा अहवाल द्या. मी 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्षपद सोडतो. एखाद्याला बदला म्हणणे सोपे आहे, पण चांगला माणूस म्हणून कठीण आहे, असे प्रतिआव्हान जयंत पाटलांनी तरुण नेत्यांना दिले. हे सगळे शरद पवारांच्या समोर घडले.
पण पवारांनी आपल्या सगळ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रस्थापित घराणेशाही विरुद्ध आवाज उठवला. घराणेशाही नसलेल्या 70 %, तरुणांना 50 % टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. पण पवारांच्या राष्ट्रवादीतली जयंत पाटलांविरुद्ध मोर्चे बांधणी जास्त गाजली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App