Congress : काँग्रेसला 1998 चा पचमढी ठराव अंमलबजावणीची “आयती” संधी; इंदिरा भवन मुख्यालयात जाऊन आखणार का रणनीती??

Congress

नाशिक : 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस ज्या वेळी 24 अकबर रोड हे मुख्यालय सोडून कोटला रोडच्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे, त्यावेळी काँग्रेसला तब्बल 27 वर्षांपूर्वी पचमढी चिंतन शिबिरात केलेला एक ठराव अंमलात आणायची “आयती” संधी प्राप्त झाली आहे. काँग्रेसच्या नव्या इंदिरा भवन नावाच्या मुख्यालयात बसून पक्षाच्या नेत्यांना नवी रणनीती आखायची ही संधी मिळाली आहे. Friendly INDI alliance parties leaving Congress alone

काय होता तो ठराव??, तो कुणी आणला होता आणि का आणला होता??, याचा थोडा आढावा घेतला तर बऱ्याच बाबींचा खुलासा होईल.

1998 मध्ये काँग्रेस सत्तेबाहेर होती. 1996 ते 1998 देशाने तीन सरकारे अनुभवली होती. पण त्यात काँग्रेसचे सरकार नव्हते. काँग्रेसच्या पाठिंब्यावरची दोन सरकारी पडून गेली होती. त्यावेळी सोनिया गांधींनी काँग्रेसची सूत्रे नुकतीच हातात घेतली होती. काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती म्हणून सोनिया गांधींनी मध्य प्रदेश मधल्या पचमढी येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर घेतले होते. त्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे बरेच नेते समाविष्ट होऊन त्यांनी एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढला होता, तो म्हणजे काँग्रेसला आता कुठल्याही पक्षाच्या गठबंधनची गरज नाही. काँग्रेस आपली “शक्तीस्थळे” गठबंधन मधल्या पक्षांना वाटून देऊ इच्छित नाही. उलट ही “शक्तीस्थळे” अधिक मजबूत करून काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवून सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे काँग्रेस कुठल्याच पक्षाशी आघाडी किंवा युती किंवा गठबंधन करणार नाही. पचमढीतल्या चिंतन शिबिरात सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा ठराव संमत केला होता. तो 2003 पर्यंत पक्षाने पाळला होता. पण 2003 मध्ये शिमल्यातील चिंतन शिबिरात काँग्रेसला गठबंधन राजनीतीचे महत्त्व समजले आणि पक्षाने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली रणनीती बदलून समविचारी पक्षांशी गठबंधन करायला हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती.

आता 2025 मध्ये काँग्रेसच्या वेळी 24 अकबर रोड या मुख्यालयात शिफ्ट होऊन इंदिरा भवन या नव्या मुख्यालयात जात आहे, त्यावेळेस काँग्रेसला 1998 चा कोणाशी गठबंधन नाही हा ठराव पुन्हा अंमलात आणायची “आयती” संधी प्राप्त झाली आहे. याचा अर्थ असा की, 1998 मध्ये काँग्रेसची कुठल्या पक्षाशी गठबंधन करायची तयारी नव्हती, तर 2025 मध्ये इंडी आघाडीतल्या कुठल्याच पक्षाची काँग्रेस बरोबरचे गठबंधन चालू ठेवायची इच्छा शिल्लक उरलेली नाही. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी, लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल, उद्धव ठाकरे यांची शिवसेना वगैरे पक्ष आता काँग्रेस बरोबरची “इंडी” आघाडी टिकवण्याच्या मन:स्थितीत राहिलेले नाहीत. ते स्वतंत्रपणे आपली वाटचाल करू इच्छितात.

याची उदाहरणे नुकतीच समोर आली आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ऐवजी आम आदमी पार्टीला पाठिंबा देऊन टाकला आहे, तर “इंडी” आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती. विधानसभा निवडणूकांशी त्या आघाडीचा काही संबंध नाही, असा निर्वाळा लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी देऊन टाकला आहे.

अशा स्थितीत काँग्रेसला 1998 चा आपला पचमढी ठराव अंमलात आणायची “आयती” संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी काँग्रेसने स्वतःहून वर उल्लेख केलेल्या पक्षांशी गठबंधन तोडायची जरुरतच उरलेली नाही. उलट ते पक्षच काँग्रेसच्या “इंडी” गठबंधन मधून स्वतःहून बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसला हव्या त्या राज्यात आणि हवी ती स्वतःची “शक्तीस्थळे” मजबूत करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे नेते नव्या इंदिरा भवनात जाऊन त्यासाठी नवी रणनीती आखणार का??, हा खरा सवाल आहे.

Friendly INDI alliance parties leaving Congress alone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात