नाशिक : 500 रुपयांच्या फरकाने महाराष्ट्रात मतदारांनी काँग्रेसला तारले नाही, तर दिल्लीत 400 रुपयांचा फरक पक्षाला तारेल का??, असा सवाल तयार झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी जाहीर केलेल्या रकमांचा 400 रुपये हा फरक आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीतल्या महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ काँग्रेसने प्यारी दीदी योजनेची घोषणा करून महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे घोषणा केली. यापैकी कोणती घोषणा महिलांना आकर्षित करेल हे पुढच्या 8 फेब्रुवारीला संपूर्ण देशाला समजेल.
पण महिलांना असे अमिष दाखवणारी घोषणा काँग्रेसने काही पहिल्यांदाच दिल्लीत केली असे नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतून निवडणूक लढवत असताना स्वतंत्रपणे जाहीरनामा घोषित करून महिलांना 2000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महिलांनी शिंदे – फडणवीस सरकारचे 1500 रुपये कबूल केले. पण काँग्रेसच्या 2000 रुपयांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला नाही. हे निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले.
मंईयां सम्मान योजना 💫 महिलाओं को 2,500 रुपए की सम्मान राशि वादा किया था – वादा निभाया 📍झारखंड pic.twitter.com/Ty7GRJzYVd — Congress (@INCIndia) January 6, 2025
मंईयां सम्मान योजना 💫
महिलाओं को 2,500 रुपए की सम्मान राशि
वादा किया था – वादा निभाया
📍झारखंड pic.twitter.com/Ty7GRJzYVd
— Congress (@INCIndia) January 6, 2025
महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी भाजप महायुतीला असा काही कौल दिला आणि काँग्रेसला असा काही जमालगोटा दिला, की तो काँग्रेससाठी सगळ्यात मोठा ऐतिहासिक पराभव ठरला, तर भाजप महायुतीसाठी ऐतिहासिक विजय ठरला. वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान करून 14 खासदार निवडून दिले होते. पण लाडक्या बहिणींनी अशी काही किमया केली, की अवघ्या चारच महिन्यांनी काँग्रेसला 16 आमदारांवर आणून ठेवले.
आता दिल्लीत काँग्रेसचा एकही खासदार नाही. विधानसभेत एकही आमदार नाही. अशा स्थितीमध्ये 2025 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जरी आम आदमी पार्टी पेक्षा 400 रुपये जास्त देण्याची कबुली दिल्लीतल्या प्यारी दीदींना दिली असली, तरी काँग्रेसच्या या 2500 रुपयांवर दिल्लीतल्या महिला विश्वास ठेवतील, की आम आदमी पार्टीच्या 2100 रुपयांवर त्या समाधानी राहतील की भाजपच्या विकासाच्या कुठल्या योजनांवर त्या भाळतील??, हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
पण दरम्यानच्या काळात काँग्रेसने झारखंड मध्ये महिलांना 2500 रुपये देण्याचे आश्वासन पाळल्याच्या जाहिराती सोडायला सुरुवात केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App