Delhi elections : राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी ममतांचा प्रादेशिक केजरीवालांना दिल्लीत पाठिंबा, काँग्रेस एकाकी!!

Delhi elections

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोलकत्यात बसून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद सांभाळ राष्ट्रीय महत्त्वाच्या बाळगलेल्या ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेसला एकाकी पाडत अरविंद केजरीवालांच्या प्रादेशिक आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. केजरीवाल यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडल वर ममतांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानून काँग्रेसला डिवचले आहे.

ममता बॅनर्जी यांनी पॉलिटिकल कॅल्क्युलेशन करत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगाल मध्ये त्यांचे मुख्य काँग्रेसशी बिलकुल जमत नाही. राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसची त्यांना जुळवून घेता येत नाही. उलट त्यांनी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचे महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत देखील काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवर अरविंद केजरीवालांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीच्या प्रादेशिक पातळीवरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे.

TMC has announced support to AAP in Delhi elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात