Aam Aadmi Party : ‘आम आदमी पार्टीच्या आमदाराचा मृत्यू त्यांच्याच पिस्तुलातून गोळी लागल्याने झाला…’

Aam Aadmi Party

पोलिसांनी केले स्पष्ट; शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता गोगीच्या घरी ही घटना घडली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Aam Aadmi Party आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि लुधियाना पश्चिमचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला. शनिवारी पोलिसांनी सांगितले की, बस्सी यांच्याच परवानाधारक पिस्तूलमधून “अपघाती गोळीबार” झाल्याची शक्यता आहे.Aam Aadmi Party

पोलिस सहआयुक्त (जेसीपी) जसकरण सिंह तेजा म्हणाले की, गोळी गोगींच्या कानावर लागली आणि त्यांना तातडीने स्थानिक दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (डीएमसीएच) नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता गोगीच्या घरी ही घटना घडल्याचे तेजा यांनी सांगितले. गोगीच्या परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडण्यात आल्याचे जेसीपीने सांगितले. ते म्हणाले, “गोगींच्या कुटुंबातील सदस्यांच्या मते, गोळी चुकून लागली.

गोगी (५८) यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी सांगितले की मृतदेह डीएमसीएचच्या शवागारात ठेवण्यात आला आहे, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि सविस्तर माहिती मिळविण्यासाठी शवविच्छेदन केले जाईल.

Aam Aadmi Party MLA dies after being shot by his own pistol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात