नाशिक : Sharad Pawar क्रिकेटच्या मैदानावर तुफानी गोलंदाजाने फेकलेला रिव्हर्स भल्याभल्या फलंदाजांची विकेट घेऊन सामन्याचे चित्र फिरवतो, पण राजकारणातला “रिव्हर्स स्विंग” एखाद्याला राष्ट्रीय राजकारणातून उचलून थेट स्थानिक राजकारणात आणून सोडतो, याचा प्रत्यय महाराष्ट्रात अनेकांनी घेतला. काँग्रेसी संस्कृतीतले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे राष्ट्रीय नेते म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, त्या यशवंतराव चव्हाण यांना देखील राजकारणातला “रिव्हर्स स्विंग” सहन करावा लागला होता. 1980 ते 85 या काळात यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणातून दूर होऊन राज्याच्या राजकारणामध्ये देखील किनाऱ्यावर राहिले होते. त्यांचे शिष्य शरद पवारांना राजकारणामध्ये जनतेनेच “रिव्हर्स स्विंग” घ्यायला लावला. कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांची फारशी डाळ शिजू शकली नाही.
पण त्या पलीकडे जाऊन आता शरद पवारांनीच “रिव्हर्स स्विंग” टाकून त्यांच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय राजकारणातून बारामती तालुक्यातल्या साखर कारखान्यांच्या राजकारणात लाँच केले आहे.
काँग्रेसी संस्कृतीतल्या राजकारणामध्ये सामान्यतः सुरवातीला पतसंस्था, शेतकरी सहकारी सोसायट्या, खरेदी विक्री संघ नंतर साखर कारखाने, साखर कारखान्यांमधून आमदारकी किंवा खासदारकी आणि नंतर राज्याच्या किंवा केंद्रातल्या मंत्रिपदावर झेप अशा साखळीतून अनेक नेत्यांनी आपले नशीब आजमावले. त्यामध्ये ते यशस्वी ठरले. खुद्द शरद पवारांचा देखील त्यात समावेश राहिला.
Narayan Rane मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवेल इतकी भाजपची ताकद, नारायण राणे यांचा विश्वास
पण या सगळ्या राजकारणापासून सुप्रिया सुळे मात्र आत्तापर्यंत अलिप्त होत्या. कारण शरद पवारांनी सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात अशी विभागणी केली होती. त्यासाठी पवारांनी नेहमीच सुप्रिया सुळे यांना केंद्रीय राजकारणातच रस असल्याचा तर्क दिला होता. शरद पवारांनी वारंवार तसे बोलूनही दाखवले होते.
पण प्रत्यक्षात त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण धुरा पुतण्या किंवा मुलगी यांच्या हातात देण्याचा निर्णायक सवाल सवाल समोर आला, त्यावेळी राष्ट्रवादी फुटली. काका – पुतण्याची फारकत झाली. बहिण – भावाचे जमले नाही. लोकसभा निवडणुकीत काकांनी पुतण्यावर मात केली, तर विधानसभा निवडणुकीत पुतण्याने काकांवर मात करून दाखवली. त्यामुळे पवारांच्या कौटुंबिक ऐक्याची चर्चा पवारांच्या घरातल्या ज्येष्ठ सुनांना सुरू करावी लागली.
पण प्रत्यक्षात ते ऐक्य साकार होणे तर सोडाच, उलट शरद पवारांच्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतली स्पर्धा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरून उतरून आता थेट साखर कारखान्यांच्या पातळीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शरद पवारांनी “रिव्हर्स स्विंग” टाकून सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय राजकारणातून थेट साखर कारखान्यांच्या राजकारणात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.Sharad Pawar
सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाने
शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये लक्ष घालायला सांगितले आहे. सुप्रिया सुळे या दोन्ही साखर कारखान्यांच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्या संदर्भात चर्चा करायला कारखान्यांवर येणार आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पुढच्याच महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे, तर माळेगावची निवडणूक दोन वर्षांनी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी अजित पवारांच्या नेतृत्वाखालची पॅनेल सत्तेवर आहेत आणि तिथेच ऊस उत्पादकांच्या मोबदल्या संदर्भात सुप्रिया सुळे लक्ष घालणार आहेत. पवारांनी “रिव्हर्स स्विंग” टाकून सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणातून साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये असे लाँच केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App