तिरुपती बालाजी – श्रीशैल्यम मल्लिकार्जुन यांचा पंतप्रधान मोदींना एकाच वेळी प्रसाद लाभ!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तिरुपती व्यंकटेश बालाजी आणि श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन महादेव यांचा एकाच वेळी प्रसाद लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज झाला आहे.Priests from Tirupati and Srisailam temples met Prime Minister Narendra Modi and gave him ‘prasad’ from the temples

तिरुपती व्यंकटेश बालाजी आणि श्रीशैल्यम मल्लिकार्जुन महादेवाच्या सेवक पुजाऱ्यांनी एकाच वेळी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवास अधिकृत निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना प्रसाद दिला.

श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन महादेवाच्या सेवक पुजाऱ्यांनी त्यांच्या हातावर मल्लिकार्जुन शिवबंधन बांधले तसेच तिरुपतीच्या व्यंकटेश बालाजीच्या सेवक पुजाऱ्यांनी महावस्त्र घालून पंतप्रधान मोदींचा सत्कार केला.

यावेळी शैव आणि वैष्णव पंथांच्या विविध मंत्रांचे उच्चारण पंतप्रधानांच्या निवासस्थानी करण्यात आले. दोन्ही तीर्थ क्षेत्रातील सेवक पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींसमवेत देश कल्याणासाठी शांती मंत्र आणि स्वस्ति मंत्रांचा उच्चार केला.

देशभरात काही नेत्यांनी आणि विचारवंतांनी हिंदू आणि हिंदुत्ववाद यांच्यात भेद असल्याच्या चर्चा सुरु केल्या असताना शैव आणि वैष्णव पंथांच्या दैवतांच्या सेवक पुजाऱ्यांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वचन मंत्रासह प्रसाद लाभ दिला आहे.

Priests from Tirupati and Srisailam temples met Prime Minister Narendra Modi and gave him ‘prasad’ from the temples

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात