विशेष प्रतिनिधी
मुंबई : न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी अनेक लोक बाहेर जात असतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन मुंबईतील दोन भुरट्या चोरांनी अनेकांना लुटले आहे. एका दिवसासाठी बंगलो आणि व्हिला रेंटवर देण्याचे आश्वासन देऊन, फोनवर बुकींग घेतले आणि 50% रक्कम.मिळताच नौ दो ग्यारा झाले. आकाश रुपकुमार जाधव आणि अविनाश रुपकुमार जाधवानी असे या दोघांचे नाव आहे.
Fraud: Two arrested in fake hotel booking case in Mumbai
तर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यामधील एक बंगला एका दिवसासाठी 72000 रुपये रेंट देऊन तक्रार कर्त्या महिलेने बुक केला होता. स्त्रीने बुकिंगची 50% रक्कम देखील दिली. ही रक्कम मिळताच त्या दोघांनी तिच्या सोबत कॉन्टॅक्ट करण्याचे थांबवले. त्यांनंतर त्या महिलेने त्या संबधित बंगल्याच्या मालकसोबत कॉन्टॅक्ट केला तेव्हा तिला कळले की हे सर्व फ्रॉड आहे.
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन
तातडीने तिने पोलिसांना गाठले. पोलिसांनी आणखी चौकशी केल्यानंतर या दोघांविरूध्द आणखी 11 तक्रारी नोंद झाल्याचे लक्षात आले. ठाणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा विविध ठिकाणी यांच्या नावाने तक्रारी नोंद झालेल्या आहेत. या दोघांना पुण्यातील विमाननगर भागातून रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App