tax evasion : GST इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) देशातील काही मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, GST इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्ससह देशभरातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सेवा प्रदात्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. यादरम्यान डीजीजीआयला मोठ्या प्रमाणावर करचोरी झाल्याचे समोर आले आहे. डीजीजीआयने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. Suspected of tax evasion DGGI raids several cryptocurrency exchange companies including WazirX and Coinswitch Kuber
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : GST इंटेलिजन्स महासंचालनालयाने (DGGI) देशातील काही मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, GST इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्ससह देशभरातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सेवा प्रदात्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. यादरम्यान डीजीजीआयला मोठ्या प्रमाणावर करचोरी झाल्याचे समोर आले आहे. डीजीजीआयने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
DGGIने वझीरएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या परिसरावरही छापा टाकला आहे. अलीकडेच, मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याबद्दल कंपनीला 49.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, DGGI ने क्रिप्टोकरन्सी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या सुमारे अर्धा डझन कार्यालयांवर छापे टाकले आहेत. तपास यंत्रणेने जीएसटीची मोठ्या प्रमाणावर चोरी पकडली आहे. हे सेवा प्रदाते क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि एक्सचेंज प्लॅटफॉर्मची सुविधा देतात. जेथे ट्रेडर्स, मर्चंट्स आणि सामान्य लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करू शकतात.
तपास यंत्रणेने जीएसटीची मोठ्या प्रमाणावर चोरी पकडली आहे. ही कथित करचोरी 70 कोटींपर्यंत असू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे सेवा प्रदाते क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि एक्सचेंज प्लॅटफॉर्मची सुविधा देतात.
DGGI सध्या Coinswitch Kuber, CoinDCX, YUCoin आणि Unocoin या ब्रँडच्या नावाखाली क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस चालवणाऱ्या कंपन्यांची चौकशी करत आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये झालेल्या आरबीआयच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने आपल्या केंद्रीय बोर्डाला सांगितले होते की, भारतात क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. यापूर्वी संसदेच्या चालू अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी विधेयक मांडण्याची तयारीही सरकारने केली होती, मात्र ते तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे.
Suspected of tax evasion DGGI raids several cryptocurrency exchange companies including WazirX and Coinswitch Kuber
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App