वृत्तसंस्था
अलिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने डॉ. दानिश रहीम यांना पीएचडी परत करण्याचा आदेश अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने दिला आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. Praising Narendra Modi, Dr. Danish Rahim ordered to return PhD; Strange management of Aligarh Girls University
भाषा विषयात त्यांना पीएचडीची पदवी देण्यात आली होती. पण, ती चुकीने दिल्याचे सांगून ती परत करण्यास अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने सांगितले आहे. त्या ऐवजी दुसरी पदवी घ्या, असा सल्ला दिला आहे. पदवी परत करा, असे पत्र त्यांचे सहयोगी मीरा नाईम यांना सुद्धा पाठविल्याचे रहीम यांनी सांगितले.
डॉ. रहीम याना ९ मार्च २०२१ रोजी पीचडी दिली होती. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर त्यांना पदवी परत करण्याचे पत्र विद्यापीठाने पाठविले आहे. ते म्हणाले, विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची स्तुती मी केली होती. नेमकी हीच बाब विद्यापीठाला खटकली आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या चेअरमन यांनी मला दोन, तीन दिवसांनी बोलावले आणि सांगितले की, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजकीय नेते आणि विरोधी पक्ष यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करू नये. मीडियामध्ये आपण जे वक्तव्य आणि हावभाव केलं. त्यानुसार आपण उजव्या विचारसणीचे दिसता. या घटनेमुळे अचंबित झालेले डॉ. रहीम यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरविले असून पंतप्रधान मोदी आणि उत्तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिक्षण अधिकारी यांच्याकडे न्याय मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App