विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दिल्लीतील रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर सध्या तुरुंगात असलेल्या गोगी आणि टिल्लू गँगच्या सदस्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गोगीवर तुरुंगात हल्ला करण्यात टिल्लू गँगचा हात असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.Police gave scurity in jail on the backdrop of gangwar
मागील अनेक वर्षांपासून दोन्ही गटामध्ये स्पर्धा सुरू होती. आता याच स्पर्धेचे रूपांतर हिंसाचारात झाले आहे. कोर्टातील गँगवॉरनंतर स्थानिक न्यायालयांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या न्यायालयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
कुख्यात गुंड आणि गुन्हेगार यांना थेट न्यायालयात सादर करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सत्र न्यायालयातील सुनावणी पार पडू शकते, असे मतही या याचिकेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. विधिज्ञ विशाल तिवारी, दीपा जोसेफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या अनुषंगाने याचिका सादर केल्या असून यात स्थानिक न्यायालयांच्या सुरक्षेबाबत आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App