‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली

Delhi-Ghazipur border opens after 10 hours, farmer dies of heart attack During Bharat Bandh

Bharat Bandh : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेला ‘भारत बंद’ आता संपला आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंददरम्यान अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखण्यात आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक वळवावी लागली. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. Delhi-Ghazipur border opens after 10 hours, farmer dies of heart attack During Bharat Bandh


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेला ‘भारत बंद’ आता संपला आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंददरम्यान अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखण्यात आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक वळवावी लागली. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदचा परिणाम जास्त दिसून आला. दिल्ली-गाझीपूर सीमादेखील 10 तासांनंतर उघडण्यात आली.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, भारत बंद संपूर्णपणे यशस्वी झाला. आता संयुक्त किसान मोर्चा पुढील रणनीती ठरवेल. दरम्यान, निदर्शनादरम्यान दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भागेल राम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

काँग्रेस, राजद, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला. या बंदला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) कडूनही पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर विचार करण्यास तयार आहे. दुसरीकडे, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही माध्यमांसमोर सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

Delhi-Ghazipur border opens after 10 hours, farmer dies of heart attack During Bharat Bandh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात