विशेष प्रतिनिधी
काबूल – येथील सर्वात मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बी.ए पदवीधारक मोहंमद अश्रफ घैरट याची नियुक्ती तालिबान राजवटीने केली असून या नियुक्तीवरून सोशल मीडियावर विरोध केला जात आहे. तालिबानच्या या निर्णयाला विरोध म्हणून विद्यापीठातील सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. Talibans eduactional orders shocked everyone
तालिबानने आपला मोर्चा आता शिक्षण क्षेत्राकडे वळवला आहे. आता काबुल विद्यापीठाचे पीएचडीधारक कुलगुरू मोहंमद उस्मान बाबरी यांना निलंबित केले असून त्याजागी बीए पदवीधारक मोहंमद अश्रफ घैरट याची नियुक्ती केली आहे. या निर्णयाला विरोध केला जात आहे.
सोशल मीडियावर देखील तालिबानच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. टीकाकारांनी गेल्यावर्षी घैरट याचे एक ट्विट व्हायरल केले आहे. त्यात त्यांनी पत्रकाराच्या हत्येचे समर्थन केले होते. पीएचडीधारकाच्या जागी एका पदवीधारकाला नियुक्त केल्यावरून नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी राजीनामे सादर केले. परंतु घैरट हा काळजीवाहू कुलगुरू असून त्यात कधीही बदल होऊ शकतो, असे तालिबानने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App