स्वतःच नेहरू – मोदींची तुलना करून चिदंबरम म्हणाले, जनता अशी तुलना नाकारते!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वतःच नेहरू – मोदींची तुलना करून चिदंबरम म्हणाले, जनता अशी तुलना नाकारते!! PM Modi in his speech compared himself with Jawaharlal Nehru. Modi

त्याचे झाले असे :

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विशेषतः तामिळनाडूमधील “इंडी” आघाडीच्या कामगिरीवर बोलण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी स्वतःच आकडेवारी मांडून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. ही तुलना करून झाल्यानंतर जनता अशी तुलना नाकारते, अशी मखलाशी त्यांनी करून टाकली.

चिदंबरम म्हणाले, अनेकजण नरेंद्र मोदींची तुलना पंडित जवाहरलाल नेहरूंशी करतात, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये 361, 374 आणि 364 जागा मिळवल्या होत्या. त्या उलट नरेंद्र मोदींनी सलग तीन निवडणुकांमध्ये 282, 303 आणि आता 240 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे नेहरू आणि मोदी अशी तुलना होऊ शकत नाही. देशाची जनता देखील अशी तुलना नाकारते.

पण देशाची जनता नेहरू आणि मोदी यांच्या तुलना नाकारते हे सांगताना स्वतः चिदंबरम यांनीच वर उल्लेख केलेली आकडेवारी मांडून नेहरू आणि मोदी यांच्या तुलनेची मखलाशी करून टाकली.

PM Modi in his speech compared himself with Jawaharlal Nehru. Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात