राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती; 9 जून रोजी NDA मंत्रिमंडळाचा शपथविधी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA आघाडीने नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड केल्यानंतर आज सायंकाळी मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएला पाठिंबा असलेल्या खासदारांच्या नावांची यादी सुपूर्द केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती करून त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना 9 जून रोजी सायंकाळी शपथविधीची सोयीचे वेळ असल्याची सूचना केली. त्यानुसार 9 जून रोजी एनडीए मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. PM Modi meets President Murmu, stakes claim to form government

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर NDA म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आणि शपथविधीची तारीख देखील सांगितली. राष्ट्रपती भवनाबाहेर माध्यमांना संबोधित करताना त्यांनी जनतेचे आभार मानत आश्वसन दिले.

नरेंद्र मोदी म्हणाले :

जनतेने मला तिसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी दिली. लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आज सकाळी एनडीएची बैठक झाली. त्यामध्ये आमच्या एनडीएच्या सहकाऱ्यांनी माझी नेतेपदी निवड केली. एनडीएच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपतींना याची कल्पना दिली. त्यानंतर मला राष्ट्रपतींनी मला पंतप्रधान म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. आम्ही त्यांना सांगितलं आहे की, येत्या 9 तारखेला शपथविधी योग्य राहील. त्यानुसार राष्ट्रपती भवनातून शपथविधी संदर्भात योग्य नियोजन होईल.

गेल्या 10 वर्षात आम्ही खूप चांगलं काम केलंय. देशभरात आणि जगातील अनेक संकटांना आपण सामोरं गेलो. जगात भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे. अर्थव्यवस्था अधिक बळकच होत आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचं पत्र दिलं आहे. तसेच त्यांनी मंत्र्यांची यादी देखील मागवली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्याआधी एनडीएच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडला आणि एनडीएच्या खासदारांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. NDA आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते, तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मोदी दुपारी आधी अडवाणी आणि त्यानंतर जोशींच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी मोदींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली.

PM Modi meets President Murmu, stakes claim to form government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात