नाशिक : देशभरात मुस्लिम प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये भाजपला 30 % जागा गमवाव्या लागल्या. देशातल्या 543 पैकी 91 मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव 15 % ते 50 % आहे. 2019 मध्ये या 91 मतदारसंघांपैकी भाजपने तब्बल 46 जागांवर विजय मिळवला होता, पण 2024 च्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपला यातला बहुतांश जागा गमवाव्या लागल्या आणि फक्त 27 जागांवर भाजपला विजय मिळवता आला. Muslim vote bank gave a 30percent punch to BJP in 91 constituencies
मुस्लिम प्रभावक्षेत्र असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपला 30 % फटका बसला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण मुस्लिम मतांचे 80% पेक्षा जास्त एकगठ्ठा मतदान. या एकगठ्ठा मतदानाला हिंदू एकजुटीच्या मतदानाची तोडीस तोड मिळाली नाही. मतदानाच्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे सगळे मुस्लिम एकगठ्ठा मतदानाचे लाभार्थी ठरले.
महाराष्ट्रात यापैकी 6 मतदार संघाचा समावेश आहे. यात धुळे, भिवंडी, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांचा समावेश होतो या सर्व मतदारसंघांमध्ये किमान चार ते पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना विशिष्ट लीड मिळाला. परंतु, मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेला लीड भाजपच्या उमेदवारांना तोडता आला नाही. मिहीर कोटेचा आणि शोभा बच्छाव याची उत्तम उदाहरणे ठरली. धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांना फक्त मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघाने असा काही हात दिला की भाजप उमेदवार सुभाष भामरे यांनी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतलेले लीड मुस्लिम बहुल मतदारसंघातच तुटले.
ईशान्य मुंबईत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना अबू असीम आझमी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या शिवाजीनगर मानखुर्द मधले मुस्लिम बहुल लीड तोडता आले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांना तिथे मोठे लीड मिळाले. त्यामुळेच बांगलादेशींनी आमचा पराभव केला, असे ट्विट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. हीच कहाणी सोलापूर, भिवंडी मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिपीट झाली.
मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये संपूर्ण देशभरात दोनच पक्ष खऱ्या अर्थाने लाभार्थी ठरले, ते म्हणजे अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जी यांची तृणामूळ काँग्रेस. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला देखील मोठा लाभ झाला. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात 36 जागा जिंकल्या, त्यापैकी समाजवादी पार्टीचे 10 खासदार मुस्लिम बहुल मतदारसंघातून निवडून आले आहेत, पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसला एकूण 29 जागा जिंकता आल्या, त्यापैकी 21 जागा मुस्लिम बहुल मतदारसंघातल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या 99 खासदारांपैकी 18 खासदार मुस्लिम बहुल भागातून निवडून आले आहेत. त्याउलट भाजपला मुस्लिम बहुल भागातील 91 जागांपैकी फक्त 27 जागांवर आपले उमेदवार निवडून आणता आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत याच 91 जागांपैकी तब्बल 46 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
वास्तविकता भाजप मिहीर कोटेचा ईशान्य मुंबई 29,861 मतांनी पराभूत मानखुर्दमध्ये 87,971 मतांची तूट मुलुंड ते घाटकोपर 58,110 लीड मानखुर्द विधानसभा (बांगलादेशी परिसर) उद्धव ठाकरे सेना 1,16,072 मत तर भाजपला 28,101 मत आम्ही बांगलादेशी परिसरात "हरलो" पराभूत झालो@BJP4Maharashtra pic.twitter.com/ghv7yDIGo6 — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) June 5, 2024
वास्तविकता
भाजप मिहीर कोटेचा ईशान्य मुंबई 29,861 मतांनी पराभूत
मानखुर्दमध्ये 87,971 मतांची तूट मुलुंड ते घाटकोपर 58,110 लीड
मानखुर्द विधानसभा (बांगलादेशी परिसर) उद्धव ठाकरे सेना 1,16,072 मत तर भाजपला 28,101 मत
आम्ही बांगलादेशी परिसरात "हरलो" पराभूत झालो@BJP4Maharashtra pic.twitter.com/ghv7yDIGo6
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) June 5, 2024
पराभवाची कारणे अनेक
मुस्लिमांचे ओबीसी करण हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेकांनी प्रचाराचा महत्त्वाचा घटक बनवला होता. त्यामुळे हिंदू समाज घटकांचे एकत्रीकरण होऊ शकेल, असा त्यांचा होरा होता. तो मर्यादित प्रमाणातच यशस्वी झाला.
त्याउलट मुस्लिमांमध्ये तथाकथित असुरक्षितता निर्माण करण्यात अखिलेश यादव ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यशस्वी ठरले. त्यामुळे मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानाचे प्रमाण वाढले. त्याला हिंदू एकजुटीच्या मताची तोडीस तोड मिळू शकली नाही.
पश्चिम बंगाल मध्ये कोलकत्ता हायकोर्टाने मुस्लिमांचे ओबीसीकरण नाकारले. 5 लाख मुस्लिमांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. ममता बॅनर्जींनी प्रचारात हा मुद्दा तापवून वापरला. त्याचा त्यांना 21 मतदारसंघांमध्ये फायदा झाला.
कर्नाटकात याच मुद्द्याचे रिपीटेशन झाले त्याचा काँग्रेसला उत्तर आणि दक्षिण कर्नाटक 9 मतदारसंघांमध्ये फायदा झाला.
ओबीसींच्या नावाखाली वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मुस्लिमांना आरक्षण दिले. त्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक नेत्यांनी मोठा आवाज उठविला आणि जनजागृती केली, पण त्याचा उलटा परिणाम झाल्याचा दावा अजीम प्रेमजी विद्यापीठातील प्रोफेसर खालीद अनीस अन्सारी यांनी केला. मोदींच्या आवाहनाचे “गांभीर्य” मुस्लिमांनी ओळखून मतदानाचा टक्का वाढविला असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
त्या तुलनेत भाजपने मुस्लिमांमधल्या पसमांदा समूहाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण तो मर्यादेपलीकडे यशस्वी ठरला नाही, याकडे अन्सारी यांनी लक्ष वेधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App