दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : NDA आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन करायचा ठराव संमत केल्यानंतर “अचानक” सायंकाळी दिल्ली विमानतळावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले त्यामुळे दिल्लीच्या संशयग्रस्त वातावरणाच्या संशयात अधिकच भर पडली. Tamil Nadu CM MK Stalin met TDP chief Chandrababu Naidu at Delhi airport.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मधूनच निवडणूक लढवली. त्यांना त्यात चांगले यश मिळाले. चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवून सत्तेवर आले. मात्र केंद्रातल्या सत्तेचे गणित काहीसे डळमळीत झाल्याने चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदीं समावेत NDA मध्ये राहणार नाहीत, असे वातावरण काँग्रेस प्रणित INDI आघाडीच्या नेत्यांनी तयार करायला सुरुवात केली. मात्र, त्याला चंद्राबाबूंनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहून तसेच मोदींच्याच नेतृत्वाखाली सरकार तयार करण्यासाठी ठराव पारित करून छेद दिला. पण INDI आघाडीच्या नेत्यांनी चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यावर गळ टाकण्याचे प्रयत्न सोडले नाहीत.

कदाचित याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि INDI आघाडीतल्या द्रविड मुन्नेत्र कळघम या महत्त्वपूर्ण पक्षाचे नेते एम. के. स्टालिन यांनी “अचानक” दिल्ली विमानतळावर चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली.

ही भेट “अचानक” यासाठी झाली की, एक मुख्यमंत्री आणि दुसरा नियोजित मुख्यमंत्री एकाच वेळी दिल्ली विमानतळावर आपापल्या राज्यांकडे निघण्यासाठी पोहोचले. तत्पूर्वी दोघांनीही आपापल्या आघाड्यांच्या बैठकीमध्ये हजेरी लावली. मात्र दक्षिणेकडल्या दोन राज्यांचे मुख्यमंत्री आणि नियोजित मुख्यमंत्री भेटल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात संशयग्रस्त राजकीय वातावरणात अधिकच संशयाची भर पडली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आपल्या आघाडीत खेचण्यासाठी सेंधमारी केली की काय??, याची चर्चा सुरू झाली!!

चंद्राबाबू नायडू यांच्याशी भेट झाल्यानंतर एम. के. स्टालिन यांनी त्या संदर्भात ट्विट केले. आंध्र विधानसभेतील विजयाबद्दल आपण चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन शेजारी राज्यांमधल्या संबंधांमध्ये सौहार्द आणण्याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू आगामी केंद्र सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि दक्षिणेकडील राज्यांची बाजू मांडतील, असा विश्वास स्टालिन यांनी व्यक्त केला. स्टालिन यांच्या ट्विट मधल्या शेवटच्या वक्तव्यामुळे दिल्लीच्या संशयग्रस्त वातावरणात अधिकच भर पडली. आता चंद्राबाबू नायडू आणि एम. के. स्टालिन यांच्या भेटीतून कोणती फलनिष्पत्ती केव्हा होणार की ती “अचानक” भेट दिल्ली विमानतळावरच विरून जाणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Tamil Nadu CM MK Stalin met TDP chief Chandrababu Naidu at Delhi airport.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात