विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. 542 जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 292 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA ला 233 जागा मिळत आहेत. यामध्ये एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे बहुमताच्या (२७२) पेक्षा ३२ जागा कमी पडल्या. भाजपला 2014 मध्ये 278 तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. एनडीए 8 जूनला सरकार स्थापनेचा दावा करू शकते. बुधवारी घटक पक्षांची बैठक झाली. 8 जूनला दावा सादर केल्यानंतर 9 जूनला शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. 5 ते 9 जून पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, पहाटे 2 वाजेपर्यंत भाजपला 240, काँग्रेसला 99, सपाला 37, टीएमसीला 29, डीएमकेला 22, टीडीपीला 16, जेडीयूला 12, शिवसेना यूटीबीला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, आरजेडी लोक जनशक्ती पक्षाला 7 जागा, रामविलास 5 तर शिवसेना शिंदे 7 जागा जिंकल्या होत्या.
मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरामध्ये भाजपने क्लीन स्वीप केला. 2019 मध्ये 9 राज्यांतील सर्व जागा जिंकल्या. 50 केंद्रीय मंत्र्यांपैकी 19 पराभूत, 31 जिंकले.
NOTA चा रेकॉर्ड: इंदूरमध्ये NOTA ला 2.18 लाख मते गेली. 2019 मध्ये, बिहारच्या गोपालगंज जागेवर NOTA ला विक्रमी 51,600 मते मिळाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App