प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदुस्थान मध्ये तुम्ही पाहुणे नाही तर हा देश तुमचे घरच आहे, अशा आपुलकीच्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाण हिंदू शीख समुदायाला आश्वस्त केले. अफगाण हिंदू शीख समुदायाच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांचे अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अफगाणी समुदायातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान मोदींचा अफगाणी पोशाख देऊन सन्मान केला.PM Modi assures Afghan Hindu-Sikh community!
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की अफगाण हिंदू शीख समुदायाचे हिंदुस्थान हे घरच आहे. तुम्ही येथे पाहुणे नाही. भारतामध्ये सीएए कायदा लागू झाल्यानंतर आपल्यासारख्या अफगाणिस्तानमध्ये पीडित असलेल्या समुदायाला भारतात राहणे अधिक सुकर आणि सोपे होईल.
https://twitter.com/BJP4India/status/1494961242045222914?s=20&t=MOeiXtUNneM0iuua40CJPQ
अफगाणिस्तानच्या पार्लमेंटचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते. त्याच्या आठवणी मोदींनी या समुदायाला सांगितल्या. तालिबानची राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानातून गुरुग्रंथसाहेब अफगाणिस्तानातून भारतात परत आणण्यात आला. त्याचा सन्मान ठेवला गेला, याची आठवण मोदींनी सांगितली त्याच वेळी खान अब्दुल गफार खान यांची आठवण देखील पंतप्रधान मोदींनी हिंदू शीख समुदायाला बरोबर शेअर केली.
शीख व हिंदू समुदायाने पंतप्रधान मोदी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. अफगाण हिंदू शीख समुदायाचा पंजाबशी विशेष लगाव आहे. उद्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर अफगाण शीख आणि हिंदू समुदायाने पंतप्रधान मोदींची भेट घेणे याला विशेष महत्त्व आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App