वृत्तसंस्था
औरंगाबाद : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात साजरी होत आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करणयात आहे. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे. Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj Statue
पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा बनविला आहे. महाराजांची मूर्ती पाहत बघत राहावी, अशीच आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी औरंगाबादसह पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने आले होते. पुतळा अनावरणावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने परिसर दुमदूमून गेला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App