छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यात ; ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये प्रतिष्ठापना


विशेष प्रतिनिधी

पुणे : पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मराठ्यांची खूप मदत झाली. त्यामुळे शिवाजी महाराजचे महत्व त्यांना मान्य करावे लागले. त्यांना हे समजले की प्राणपणाने लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज ही आहे. त्यातून स्मारकाची ही कल्पना पुढे आली. त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते. The world’s first statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Pune

राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. पुण्यातील तत्कालीन भांबुर्डा गावात (शिवाजीनगर) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये तो मोठ्या समारंभ पूर्वक स्थापन करण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यात आले. १६ जून १९२८ रोजी पुतळ्याचे अनावरण झाले. त्याकाळी शिवजयंती 16 जूनला साजरी होत असे. आणखी ६ वर्षांनी शिवछत्रपतींच्या या जगातील पहिल्या पुतळ्याच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होतील.



१९१७ साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. ज्या ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला होता , त्याच इंग्लंडचा युवराज छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. युवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचे आमंत्रण स्वीकारले. १९ नोव्हेंबर १९२१ ला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला.

मुंबई डाॅकयार्डात तब्बल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटे पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला. प्रख्यात शिल्पकार नानासाहेब करमरकरांनी तो अभ्यासपूर्वक साकारला. साडेतेरा फूट उंच, तेरा फूट लांब आणि साडे तीन फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला. पुतळ्याच्या पाठीमागे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी जी सन्मानाची वागणूक दिली तो प्रसंग ब्रॉन्झमध्ये कोरण्यात आला तर पुतळ्याच्या उजव्या बाजूला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग ब्रॉन्झ मध्ये चितारण्यात आला.

मुंबईहून – पुण्याला रेल्वेच्या व्हॅगनने अनेक प्रयत्नांनी, खूप काळजीपूर्वक आणला गेला. मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरचे अनेक बोगदे लक्षात घेत कमी उंचीची खास व्हॅगन तयार करण्यात आली. पुतळ्यासोबत प्रवास करणाऱ्या जवळपास पन्नास कामगारांनी डोळ्यात तेल घालून तो पुणे स्टेशनवर आणला.

१० जून १९२८ ला हा पुतळा पुण्यात पोहचला. पुणे स्टेशनपासून वाजत-गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. दिमाखदार सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता.

The world’s first statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात