विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: तिरुपती देवस्थानला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या केसांतून सुमारे 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याठिकाणी भाविकांचे केस कापण्यासाठी 600 न्हाव्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.Tirupati Devasthan earns Rs 126 crore from devotees’ hair, 600 bathers appointed to cut hair
तिरुपती देवस्थानला येणारे भाविक तिथे केसांचं दानही करत असतात. या केसांपासून मंदिर प्रशासनाला मोठी कमाई होते. या मंदिरात दर्शनाला गेलं की देवाला डोक्यावरचे केस अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज आहे.
तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती देवस्थानने आपला 2022-23 या वषार्चा अर्थसंकल्प सादर केला. तिरुमलाच्या प्राचीन भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या प्रशासकीय मंडळाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये 3,096.40 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे.
बजेट बैठकीत पुढील 12 महिन्यांच्या आर्थिक योजनेचा आढावा घेतल्यानंतर बोडार्चे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आणि कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी यांनी, बोडार्ने वार्षिक बजेटला मंजुरी दिली आहे.
मंदिराच्या वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे 1,000 कोटी रुपये भक्तांकडून पवित्र ‘हुंडी’ (दान-पाट) मध्ये येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमधील ठेवींवर सुमारे 668.5 कोटी रुपये व्याज मिळेल. विविध तिकिटांच्या विक्रीतून 365 कोटी रुपये आणि लड्डू प्रसादमच्या विक्रीतून 365 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज बजेटमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय निवास आणि विवाह हॉलच्या भाड्यातून 95 कोटी रुपये आणि भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे विविध सेवांवर वर्षभरात 1,360 कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित आहे.
तिरुपती बालाजी मंदिराबाबत असे मानले जाते की जो भाविक येथे येऊन केस दान करतो, त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते आणि त्याची सर्व संकटं दूर होतात. देवी लक्ष्मी सर्व पापं आणि दुष्कृत्यांचा त्याग करणाऱ्या व्यक्तीचे सर्व दु:ख दूर करते, असं मानलं जातं.
म्हणून इथं स्त्री-पुरूष आपले केस सर्व वाईट आणि पापांच्या रूपात सोडतात. दररोज सुमारे 20 हजार लोक तिरुपती मंदिरात केस दान करून जातात. हे काम पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसरात सुमारे सहाशे न्हावी ठेवण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App