शशी थरुर यांचे भारतविरोधी ट्विट, म्हणे भाजपच्या सदस्यांना बंदी घालण्याची कुवेती खासदारांची मागणी, कुवेतच्या भारतीय दुतावासाकडून निषेध


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी भारताची बदनामी करणारे ट्विट केले आहे. कुवेतने भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घालावी अशी मागणी काही संसद सदस्यांनी केली असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. पाकिस्तानातील व्यक्तीचे ट्विट रिट्विट केल्याबद्दल कुवेतमधील भारतीय दुतावासाने याप्रकरणी थरुर यांचा निषेध केला आहे.Shashi Tharoor’s anti-India tweet says Kuwaiti MPs demand ban on BJP workers, protests from Indian embassy in Kuwait

हे ट्विट एका पाकिस्तानी एजंटचे होते ज्यांना त्यांच्या भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानचा शांतता राजदूत पुरस्कार मिळाला होता, असा आरोप कुवेतच्या भारतीय दुतावासाने केला आहे. यावर थरूर म्हणाले की ते या व्यक्तीचे समर्थन करत नाहीत; परंतु त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल चिंतित आहेत.



शशी थरूर यांनी शुक्रवारी एक ट्विट शेअर केले ज्यात दावा केला आहे की कुवेतच्या संसद सदस्यांनी सरकारला पत्र लिहून भारतातील भाजप सदस्यांच्या प्रवेशावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. मुस्लिम मुलींचा सार्वजनिक छळ होताना पाहू शकत नाही, असे या द्विटमध्ये म्हटले आहे. त्यात पत्राचा स्क्रीनशॉटही जोडला होता.

शशी थरूर यावर म्हणाले, भारतातील इस्लामोफोबिया वाढत आहे. त्याचा निषेध करण्याची पंतप्रधानांची इच्छा नाही, असे मी आखातीतील मित्रांकडून मी ऐकले आहे,कुवेतमधील भारतीय दूतावासाने शशी थरूर यांच्या ट्विटची दखल घेत मूळ ट्विट करणाºया व्यक्तीला पाकिस्तानच्या पुरस्काराचा फोटो पोस्ट केला आहे.

भारतीय संसदेच्या माननीय सदस्याने भारतविरोधी कृत्यांसाठी ‘शांतता दूत’ हा पाकिस्तानी पुरस्कार प्राप्त केलेल्या पाकिस्तानी एजंटने केलेले भारतविरोधी ट्विट रिट्विट करताना पाहून वाईट वाटते. आम्ही अशा भारतविरोधी घटकांना प्रोत्साहन देऊ नये, असे दूतावासाने म्हटले आहे.

थरुर यांनी यावर म्हटले आहे की ज्या व्यक्तीचे ट्विट शेअर केले आहे त्याला ते समर्थन देत नाहीत. मात्र, ट्विटमध्ये व्यक्त केलेल्या भावनांबद्दल ते चिंतित आहेत. दूतावासाचे मत त्यांना मान्य आहे. परंतु, भारतविरोधी शक्तींना सरकारने बळ देऊ नये.

Shashi Tharoor’s anti-India tweet says Kuwaiti MPs demand ban on BJP workers, protests from Indian embassy in Kuwait

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात