चीनमध्ये अल्पंसख्यांकांचा छळ, अमेरिकेने कठोर पावले उचलत व्यापारी निर्बंध लावण्यास केली सुरूवात


चीन मध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या विरोधात चालवल्या जाणाऱ्या दमनकारी अभियानाविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनसोबत व्यापारी संबधांवर नियंत्रण आणायला सुरूवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रात गरजेच्या असणाऱ्या कच्चा चिनी मालाच्या सामानाला अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.Persecution of minorities in China, the United States began to take drastic steps to impose trade restrictions


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीन मध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या विरोधात चालवल्या जाणाऱ्या दमनकारी अभियानाविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनसोबत व्यापारी संबधांवर नियंत्रण आणायला सुरूवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रात गरजेच्या असणाऱ्या कच्चा चिनी मालाच्या सामानाला अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.

एपी या न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सरकारने सोलर पॅनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या चीनी मालावर बंदी आणली आहे. आता या उत्पादनाला अमेरिकेच्या बाजारात विकता येणार नाही,असे आदेश बायडेन सरकारने जारी केले आहेत.



अमेरिकी सरकारच्या निर्णयानंतर चीनी मालांच्या ऑर्डर रोखण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर सोलर पॅनल बनवणाऱ्या सहा कंपन्यांनाही अमेरिका ब्लॅकलिस्ट करणार आहे.चीनच्या जिनजयांग प्रांतात मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या विरोधात सरकार दमणकारी भूमिकेत आहे.

चीनच्या या धोरणाविरोधात अनेक देश एकत्र येताना दिसत आहे. ल्पसंख्यांकांवरचे दमण थांबवण्यासाठी चीनची आर्थिक कोंडी करण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. अमेरिकेची कारवाई याचाच एक भाग आहे.

Persecution of minorities in China, the United States began to take drastic steps to impose trade restrictions

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात