विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल 12 खासदार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या मुद्द्यावर तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे दोघेही उपस्थित आहेत.Pawar – Raut at Sonia’s house; Opposition meeting on 10 Janpath Trinamool, YSR Congress leader absent
दोनच आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईमध्ये येऊन शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे तसेच शरद पवार यांची भेट घेऊन “वेगळी राजकीय हवा” तयार केली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
सिल्वर ओकच्या पोर्च मध्ये शरद पवार यांच्या शेजारी उभे राहून ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे राजकीय अस्तित्वच पुसून टाकले होते. कहाॅ हे युपीए?, असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला होता. त्यावेळी शरद पवार हे त्यांच्या शेजारी उभे होते.
परंतु त्यानंतर दोनच आठवडे उलटून गेल्यानंतर शरद पवार हे आज सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्यासमवेत संजय राऊत हे देखील आहेत.
Delhi: A meeting is underway at the residence of Congress chief Sonia Gandhi, regarding the situation in Parliament. NCP chief Sharad Pawar, DMK MP TR Balu, Shiv Sena MP Sanjay Raut, Congress leader Rahul Gandhi and LoP in Rajya Sabha Mallikarjun Kharge are present at the meeting — ANI (@ANI) December 14, 2021
Delhi: A meeting is underway at the residence of Congress chief Sonia Gandhi, regarding the situation in Parliament. NCP chief Sharad Pawar, DMK MP TR Balu, Shiv Sena MP Sanjay Raut, Congress leader Rahul Gandhi and LoP in Rajya Sabha Mallikarjun Kharge are present at the meeting
— ANI (@ANI) December 14, 2021
संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्याऐवजी यूपीएचे नेतृत्व अर्थात अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे सोपवावे, अशी सूचना केली होती. परंतु त्या सूचनेची काँग्रेसने पुरती वासलात लावली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने तर सोडाच पण राज्यातल्या नेतृत्वाने देखील शिवसेनेवर या मुद्द्यावरून टीकेची जबरदस्त झोड उठवली होती.
त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा झाला
त्यामध्ये काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांचे ऐक्य करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, आता ती भूमिका देखील बदलून शरद पवार आणि संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित आहेत.
परंतु, या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते वायएसआर काँग्रेसचे नेते उपस्थित नाहीत. त्यामुळे विरोधी ऐक्यासंदर्भात शरद पवार आणि संजय राऊत यांची नेमकी भूमिका काय??, याबद्दलही संभ्रम तयार झाला आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App